ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
मालवणात मतदान जन जागृतीपर पथनाट्य कार्यक्रम.

मालवणात मतदान जन जागृतीपर पथनाट्य कार्यक्रम.

प्रकाशन: 19 Apr 2024 05:42 AM
वाचन संख्या 364

निवडणूक आयोगाचे निर्देश आणि जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार आयोजीत प्रबोधन पंधरावडा उपक्रम.

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. संतोष जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली काल १८ एप्रिलला सायंकाळी मालवण फोवकांडा पिंपळ, भरड नाका आणि मालवण एस टी स्टॅण्ड येथे निवडणूक जनजागृतीपर पथनाट्य सादरीकरण करण्यात आले. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार मतदान जनजागृती, तसेच मतदारांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रबोधन करण्यासाठी पंधरावडा साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी श्री. किशोर तावडे, सिंधुदुर्ग यांजकडून सूचनेनुसार मालवण शहरात १० एप्रिल पासून पासून विविध कार्यक्रम (मतदार सेल्फी पॉईट, मतदार स्वाक्षरी मोहिम) आयोजित करण्यात आले.

मालवण फोवकांडा, भरड नाका व मालवण एस टी स्टॅण्ड येथे मालवण नगरपरिषदेमार्फत आरोस येथेल आर्टस, कॉमर्स, कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे मतदार जनजागृती करीता पथनाटय आयोजित करण्यात आलेले होते. या कार्यक्रमांच्या वेळी मालवण नगरपरिषद कर्मचारी व मालवण शहरातील नागरीक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स