ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
वैभववाडी भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या अध्यक्षपदी गंगाराम अडुळकर तर महिला अध्यक्षपदी राधिका शेळके ; जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी कार्यकारिणी केली जाहीर.

वैभववाडी भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या अध्यक्षपदी गंगाराम अडुळकर तर महिला अध्यक्षपदी राधिका शेळके ; जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी कार्यकारिणी केली जाहीर.

प्रकाशन: 18 Apr 2024 03:37 PM
वाचन संख्या 103

वैभववाडी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या अध्यक्षपदी गंगाराम अडुळकर तर महिला अध्यक्षपदी राधिका शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुका कार्यकारिणी नुकतीच जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी जाहीर केली. भाजप तालुका मंडळ अध्यक्ष नासीर काझी, भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी मारुती मोहिते, सुरेश बोडके, दिपक गजोबार, नगरसेविका सुंदरी निकम, व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वैभववाडी तालुक्याचे सुपुत्र संजय राठोड यांची निवड सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस पदी निवड जाहिर करण्यात आली.

वैभववाडी भाजपा भटके विमुक्त आघाडी कार्यकारणी पुढिल प्रमाणे – अध्यक्ष गंगाराम भैरू आडुळकर, उपाध्यक्ष गंगाराम शिंदे, सदानंद शंभुनाथ गोसावी, उपाध्यक्ष राजेश सदाशिव गजोबार, उपाध्यक्ष – बापू उर्फ शामराव धाऊ शेळके, सरचिटणीस रवींद्र गणपत भागवत, संघटक सरचिटणीस प्रकाश झोरे, चिटणीस चंद्रकांत बोडेकर, कु.संतोष गुरखे, चिटणीस बबन खरात, कार्याध्यक्ष खेरू वालू पवार, मनोहर बोडेकर, संपर्कप्रमुख नवलू झोरे, तालुकाप्रमुख सल्लागार-दाजी बर्गे, सल्लागार मधुकर कोकरे, सल्लागार- सदाशिव माने, मीडिया प्रमुख- रुपेश निकम.

भाजपा भटके विमुक्त महिला आघाडी वैभववाडी कार्यकारिणी – तालुका महिला अध्यक्ष- सौ.राधिका शामराव शेळके, उपाध्यक्ष श्रीमती सुंदरी रामचंद्र निकम, सरचिटणीस-रुक्मीणी पांडुरंग शेळके, दिपा दीपक गजोभार.

भाजपा भटके विमुक्त आघाडी वैभववाडी तालुका युवक कार्यकारणी – तालुका युवा अध्यक्ष – कुमार अनिल राजेश कोकरे, सरचिटणीस-निलेश लक्ष्मण शेळके, तर भाजपा भटके विमुक्त आघाडी वैभववाडी शहर अध्यक्षपदी- संतोष बापू निकम यांची निवड करण्यात आली आहे. सर्व पदाधिकारी यांचे नवलराज काळे यांनी आभार मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स