ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
हडपीड येथे हजारो भाविकांनी अनुभवला संत सत्वदर्शन सोहळा.

हडपीड येथे हजारो भाविकांनी अनुभवला संत सत्वदर्शन सोहळा.

प्रकाशन: 11 Apr 2024 12:03 AM
वाचन संख्या 170

श्री स्वामी समर्थ प्रकट दिन तसेच श्री स्वामी समर्थ मठाचा पाचवा वर्धापनदिन उत्साहाने संपन्न.

मसुरे | प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालित देवगड तालुक्यातील हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठाचा पाचवा वर्धापन दिन सोहळा व स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला. यानिमित्ताने संत पीठाचे अधिष्ठान श्री विठ्ठल यांच्यासह श्री संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत पुंडलिक, संत गोरा कुंभार, संत नामदेव या संत सत्वदर्शन सोहळा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी हजारो स्वामी भक्त उपस्थित होते.

केंद्रीयमंत्री नारायण राणे, आम नितेश राणे यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवरानी स्वामींचे दर्शन घेतले. प्रकट दिन व मठाच्या पाचव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त ९ एप्रिल रोजी शिरगाव येथील श्री पावणादेवी मंदिरापासून श्री स्वामी समर्थ मठापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी विठ्ठल आणि पाच संतांच्या मंदिरातील सत्वांचे मठात आगमन झाले. बुधवारी १० एप्रिल रोजी पहाटे ५ वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. पादुकापूजन, श्रींची महापूजा, लघुरुद्र, कुंकुमार्चन, नामस्मरण, दुपारी पालखी सोहळा, महाआरती, महाप्रसाद, सायंकाळी प्रज्ञा देशपांडे (पुणे) यांचे कीर्तन, श्री भगवती कला दिंडी (तोरसोळे) यांचा कार्यक्रम, हरी ओम प्रासादिक भजन मंडळाचे बुबा तन्मय परब विरुध्द श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळाचे बुवा सुशांत जोईल यांच्यामध्ये डबलबारी भजनाचा सामना झाला. उत्सव निमित्त गाभाऱ्यात फळांची आकर्षक आरास करण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थापक अध्यक्ष प्रभाकर राणे व सचिव नंदकुमार पेडणेकर यांच्या सह मुंबई व गांव समिती सर्व पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ यांनी मेहनत घेतली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स