रोझरी इंग्लिश स्कूलच्या कु. सान्वी परबचा प्रशालेच्या वतीने सत्कार.
मालवण | सुयोग पंडित : मालवण शहरातील रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेतील पहिलीची विद्यार्थीनी कु. सान्वी परबचा प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक फादर ऑल्वीन गोन्साल्वीस यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला. कु. सान्वी विक्रम परब हिने ऑल इंडिया ब्रेन डेवलपमेंट परीक्षेत सुवर्णपदक प्राप्त केले त्याबद्दल तिचा सत्कार संपन्न झाला. कु. सान्वी हिने या परीक्षेत १०० पैकी ९३ गुण मिळवत सिंधुदुर्ग जिल्ह्यात द्वितीय, मालवण तालुक्यात प्रथम आणि देशात ४८ वा क्रमांक प्राप्त केला आहे.
कु. सान्वी परब हिच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक फादर ऑल्वीन गोन्साल्वीस यांनी प्रशालेच्या वतीने तिचे आणि आई – वडिल यांचे विशेष अभिनंदन केले. या सत्कारप्रसंगी मुख्याध्यापक फादर ऑल्वीन गोन्साल्वीस यांच्यासह ऑल इंडिया ब्रेन डेवलपमेंट परीक्षेतील अन्य सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनी, व ेतर कर्मचारी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)