ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
सिंधुदुर्ग जिल्हावासियांकडून आमदार वैभव नाईक यांच्यावर वाढदिवसाला  शुभेच्छांचा वर्षाव.

सिंधुदुर्ग जिल्हावासियांकडून आमदार वैभव नाईक यांच्यावर वाढदिवसाला शुभेच्छांचा वर्षाव.

प्रकाशन: 27 Mar 2024 09:06 PM
वाचन संख्या 150

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हावासियांनी २६ मार्चला आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवशी शुभेच्छांचा वर्षाव केला. वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सायंकाळी आ. वैभव नाईक यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या अभिष्टचिंतन कार्यक्रमामध्ये देखील मोठ्या संख्येने जिल्हावासीय उपस्थित होते. शुभेच्छा देण्यासाठी झुंबड लागली होती. यावेळी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत केक कापून आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले की आमदार वैभव नाईक यांच्यासारखा निष्ठावंत सच्चा कार्यकर्ता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत निष्ठेने राहिला याचा अभिमान आहे. म्हणून निष्ठावंत शिवसैनिकांचा वाढदिवस आपण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असल्याचेही राऊत यांनी सांगितले.

याप्रसंगी शिवसेना उपनेते राजन साळवी, उपनेते अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, अतुल रावराणे, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, अर्चना घारे, गीतेश राऊत, काँग्रेस कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, जान्हवी सावंत, नीलम पालव, मंदार शिरसाट, सुशांत नाईक, नागेश मोरये, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस भास्कर परब,सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी,संग्राम प्रभुगावकर, मुरलीधर नाईक, उद्योजक सतीश नाईक, संकेत नाईक, आमदार वैभव नाईक यांच्या आई सुषमा नाईक, पत्नी स्नेहा नाईक, मुलगी नंदिनी नाईक, मुलगा राजवर्धन नाईक, मेधज नाईक, उद्योजक प्रशांत पोकळे, उद्योजक स्वरूप कदम, शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, बाळा गावडे, हरी खोबरेकर, रुपेश राऊळ, बाळू परब, शैलेश भोगले, राजू शेटये, बुवा तारी, संतोष तारी, जयेश नर, मिलिंद साटम,मंगेश लोके, मंदार केणी, शिल्पा खोत, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष साक्षी वंजारी, आप जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणेकर, ऍड किशोर वरक, अजित राऊळ, बाळा भिसे, रुपेश नार्वेकर, राजू राठोड यांच्यासह बहुसंख्येने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक, मित्रपरिवार, व्यापारी, उद्योजक आणि वैभव नाईक प्रेमी,मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स