ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
वागदेत जमीन मालकांनी मिडल कटचे काम पाडले बंद..!

वागदेत जमीन मालकांनी मिडल कटचे काम पाडले बंद..!

प्रकाशन: 17 Oct 2021 01:34 PM
वाचन संख्या 29

अपघात होत असल्याने वाहतूक वळवण्यासाठी मिडल कट देत असताना विरोध;पोलीस बंदोबस्त असतानाही केला विरोध..!

कणकवली | उमेश परब : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करत असताना वागदे उभादेव समोरील जमीन मालकांना अद्यापही मोबदला मिळाला नाही. दरम्यान वागदेत हळवल फाटा व पेट्रोल पंपासमोर दोन अपघात आज झाल्याने पोलिसांनी मोबदला द्यायची रक्कम असलेला जमीनीचा भाग वगळता मिडल कट देऊन वाहतूक सुरू करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यावेळी जमीन मालक घाडीगावकर कुटुंबियांनी “मिडल कट”च्या कामाला कडवा विरोध करत काम बंद पाडले. अखेर प्रताधिकारी व उपअभियंता यांच्या उपस्थितीत पोलिसांसमक्ष बैठक घेण्याच्या मुद्द्यावर काम बंद करत आंदोलन थांबवण्यात आले आहे.प्रसंगी, घाडीगांवकर कुटुंबियांच्या वतीने मोबदला न मिळाल्यास प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा देखील या वेळी देण्यात आला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर वागदे येथे मोठ्या प्रमाणात एकमार्गी वाहतुकीमुळे अनेक अपघात होत आहेत. त्याचप्रमाणे आज वेगवेगळे दोन अपघात झाले,यात अनेक जखमी झाले आहेत. त्यामुळे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात आर्यादुर्गा फाट्या समोर मिडल कट करत होणारे अपघात रोखण्यासाठी काम जेसीबीच्या सहाय्याने चालू केलं होतं. त्यावेळी जमीन मालकांनी कडवा विरोध केला.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, वाहतूक पोलीस निरीक्षक अरुण जाधव,पोलीस उप निरीक्षक विनायक चव्हाण,पोलीस कॉन्स्टेबल पांडूरंग पांढरे, किरण बाळू मेस्त्री,वागदे उपसरपंच रुपेश आमडोस्कर, लक्ष्मण घाडीगांवकर, जमीन मालक बाबाजी घाडीगावकर,महादेव घाडीगावकर, सखाराम घाडीगांवकर,शिवराम घाडीगावकर,दत्ताराम घाडीगावकर, एकनाथ घाडीगांवकर, प्रकाश परब व वाहतुक पोलीस ,कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी साहेब पोलीस निरीक्षक श्री. खंडागळे यांच्यासमोर जमीन मालकांनी तात्पुरती उपाययोजना करून आमच्या पोटावर मारु नका.आमच्या पैशाची जबाबदारी कोण घेणार? अनेक लोकांनी आश्वासने दिली.अद्याप आमचा मोबदला मिळालेला नाही. प्रांत अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही यावेळी जमीन मालकांनी केला. शेवटी झालेल्या वादाबाबत व कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयात महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, संबंधित ठेकेदार पोलीस व जमीन मालक यांची संयुक्त बैठक आयोजित करून यावर निर्णय घेण्याच्या मुद्यावर काम बंद करण्यात आले.त्यावेळी काही काळ वातावरण तणावग्रस्त बनले होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स