इंदिरा कॉम्प्लेक्स ते नगरपरिषद मार्गचे डांबरीकरण आणि भरड नाका ते हडकर मार्ग डांबरीकरण पूर्ण.
माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांनी या रस्ते विकासकामांबद्दल संबंधित सर्वांचे मानले आभार.
मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपरिषद हद्दीतील इंदिरा कॉम्प्लेक्स ते नगरपरिषद रस्ता खड्डेमय बनला होता. या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे यासाठी माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्या माध्यमातून मागणी पाठपुरावा सूरू होता. अखेर या मार्गाचे नगरोत्थान जिल्हास्तर निधीतून रस्ते विकास डांबरीकरण पूर्ण झाले आहे. याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले. याच दरम्यान भरड नाका ते हडकर मार्ग रस्ता डांबरीकरण करणे, हे रस्ते विकासकामे ही पूर्ण झाले आहे. या बाबतही यतीन खोत यांनी मागणी व पाठपुरावा केला होता.
या परिसरातील रस्ते विकासकामे पूर्ण झाली आहेत. विकासकामे पूर्ण करण्यात ज्यांचे ज्यांचे योगदान आहे व सहकार्य आहे त्या सर्वांचे व संबंधित यंत्रणांचे माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांनी आभार मानले आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)