कणकवली नगरपंचायत प्रभारी मुख्याधिकारी श्री विशाल खत्री यांची माऊली मित्र मंडळांने घेतली सदिच्छा भेट.
कणकवली | प्रतिनिधी : कणकवलीतील माऊली मित्रमंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या उपस्थितीत कणकवली नगरपंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी श्री विशाल खत्री ( आय ए एस ) यांची आज सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी माऊली मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळाचे सल्लागार संजय मालंडकर, सुभाष उबाळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळाचे (अप्पासाहेब पटवर्धन चौक) येथे नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या सुलभ शौचालयच्या स्वच्छते करीता, नगरपंचायत कर्मचारी किशोर धुमाळे यांच्याकडे स्वच्छतेचे साहित्य सुपूर्द करण्यात आले. यावेळी माऊली मित्र मंडळाचे सर्फराज शेख, प्रभाकर कदम, योगेश रंगराव पवार, अविनाश गावडे, भगवान कासले, प्रसाद उगवेकर, लक्ष्मण महाडिक, प्रसाद पाताडे, बाबुराव घाडीगावकर, सईद नाईक, ज़मील कुरैशी, नुरमहम्मद शेख, राम शाम सुर्यवंशी, हेमंत नाडकर्णी, विशाल रजपूत, बशीर कुरैशी, निलेश निखार्गे, आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते तसेच यावेळी कणकवली नगरपंचायतचे कर्मचारी प्रशांत राणे, सचिन नेरकर, प्रविण गायकवाड, रमेश राणे, संदिप मुसळे, सिध्देश सावंत, सचिन तांबे उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)