भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या सिंधुदुर्ग जिल्हा युवक आघाडी अध्यक्षपदी प्रकाश पवार यांची नियुक्ती.
ब्यूरो न्यूज : भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा युवक आघाडी अध्यक्षपदी प्रकाश पवार यांची निवड झाली आहे. भाजप भटके विमुक्त आघडीचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष श्री नवलराज काळे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली तसेच राहुलभैया केंद्रे (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाजपा भटके विमुक्त आघाडी) यांच्या मान्यतेने आणि भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या युवक जिल्हाध्यक्ष प्रकाश पवार यांची निवड जाहीर केली. प्रकाश पवार यांना दिलेली जबाबदारी ते सर्वांना एकत्र घेऊन पार पडतील असा विश्वास व्यक्त करत त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी भाजप भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष बाळा गोसावी, जिल्हा चिटणीस सुशील खरात व इतर युवा कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)