ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
पुण्यक्षेत्र श्री. मोरयाचा धोंडा येथील हायमास्ट टॉवरचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजन.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

पुण्यक्षेत्र श्री. मोरयाचा धोंडा येथील हायमास्ट टॉवरचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजन.

प्रकाशन: 11 Mar 2024 02:53 PM
वाचन संख्या 259

आमदार स्थानिक विकास निधीअंतर्गत ५ लाख रुपये केले मंजूर.

मालवण | सुयोग पंडित : मालवण किनारपट्टीवरील पुण्यक्षेत्र मोरयाचा धोंडा येथे हायमास्ट टॉवरसाठी आमदार वैभव नाईक यांनी आपल्या आमदार फंडातून ५ लाख रुपये निधी मंजूर केला आहे. या कामाचे भूमिपूजन आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या आधी आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग किल्ला येथील शिवराजेश्वर मंदिर नुतनीकरणासाठी, महाराजांच्या सिंहासनासाठी भरीव असा निधी दिला होता. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने आमदार वैभव नाईक यांचे आभार मानण्यात आले. या कामाला प्रत्यक्ष सुरुवात देखील करण्यात आली आहे. यावेळी आमदार वैभव यांनी आपण दाखवलेला विश्वास कधीही पायदळी जावू देणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज पावन झालेल्या भूमीत या मतदार संघाचा आमदार म्हणून काम करत आहे हे आपल्यासाठी अभिमानास्पद असून जे काही करता येईल ते यापुढील काळात करत राहू असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, शहरप्रमुख बाबी जोगी, उपशहरप्रमुख राजू परब, तपस्वी मयेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, शाखाप्रमुख हेमंत मोंडकर, शाखाप्रमुख गणेश चव्हाण, महिला उपशहरप्रमुख अंजना सामंत, चंदू खोबरेकर, संतोष ढोके, दीपक ढोके, प्रकाश चांदेरकर, बबलू तारी, गणेश भगत, भक्ती तोडणकर, दाजी जोशी आदी शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स