ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
भरतगड इंग्लिश मिडियम येथे महिला दिन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

भरतगड इंग्लिश मिडियम येथे महिला दिन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

प्रकाशन: 10 Mar 2024 10:43 AM
वाचन संख्या 155

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल मसुरे येथे जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला. प्रारंभी महिला पालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना संतोषी मांजरेकर यांनी केली. प्रशालेच्या शिक्षिका रेश्मा बोरकर, रसिका मेस्त्री यांच्या गायनाने कार्यक्रमाची रंगत वाढली. प्रशालेच्या विद्यार्थिनींनी ऐतिहासिक व्यक्तिरेखांचे सादरीकरण केले. पालकांकडून पाककलांचे सादरीकरण करण्यात आले. शेवटी फनी गेम्स मध्ये पालकांनी सहभागी होऊन आनंद लुटला. रत्ना लब्दे, गायत्री प्रभूगावकर, सावली धुरी, शमिका बांदकर, तसेच प्रशालेच्या इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी मनस्वी नाईक, उत्कर्षा बांदकर यांनी सुद्धा पाककलेचे सादरीकरण केले होते. या सर्वांचा गौरव करण्यात आला. तसेच फनी गेम्स मध्ये विजेते झालेले श्रुती वंजारे,सावली धुरी, अदिती मेस्त्री यांचा देखील गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धृती भोगले व सुहानी मापारी या इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी केले. विद्यार्थ्यांमधून पार्थ मुळीक यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच पालकांमधून रत्ना लब्दे व गायत्री प्रभुगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

गौतमी प्रभुगावकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेचे मुख्याध्यापक किशोर देऊलकर, तसेच शिक्षक समीर गोसावी, पार्वती कोदे, संतोषी मांजरेकर, संजना प्रभूगावकर, गौतमी प्रभूगावकर , सायली म्हाडगूत, रंजनी सावंत, स्टेला लोबो, स्वरांजली ठाकूर, रसिका मेस्त्री, सविता मेस्त्री, तनुश्री नाबर, रेश्मा बोरकर तसेच प्रशालेचे कर्मचारी वसंत प्रभूगावकर, समीर सावंत,प्रिया पाटकर, चव्हाण या सर्वांनी योगदान दिले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स