गाबित समाज, सिंधुदुर्ग च्या शिष्टमंडळाने घेतली मंत्री छगन भुजबळ यांची भेट.
मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य पुरवठा मंत्री श्री छगन भुजबळ यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्या दरम्यान , ७ मार्चला त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी महासंघाच्या विविध पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा आयोजित केली .
यावेळी गाबीत समाज सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष श्री चंद्रशेखर उपरकर यांनी श्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात घेतलेल्या भूमिकेचे समर्थन केले. तसेच भविष्यातील लढ्यासाठी गाबित समाज या भूमिकेच्या पाठीशी ठाम उभा राहील याची ग्वाही दिली.
यावेळी मंत्री श्री. छगन भुजबळ यांना गाबित समाजाला भेडसावणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय योजना याबाबत माहिती देत चर्चा केली आणि अखिल भारतीय गाबित समाज यांनी गाबित समाजा संदर्भात प्रकाशित केलेले ‘गाबित’ हे पुस्तक भेट दिले.
यावेळी गाबित समाज जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री वसंत तांडेल व इतर मान्यवर उपस्थित होते अशी माहिती श्री. रविकिरण चिंतामणी तोरसकर (जिल्हा संघटक, गाबित समाज ,सिंधुदुर्ग) यांनी प्रसिद्धी संदेशाद्वारे दिली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)