ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आमदार वैभव नाईक यांनी मंजूर केलेल्या ६ कोटी १० लाखाच्या चिंदर तेरई जोड रस्त्याचे केले भूमिपूजन संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आमदार वैभव नाईक यांनी मंजूर केलेल्या ६ कोटी १० लाखाच्या चिंदर तेरई जोड रस्त्याचे केले भूमिपूजन संपन्न.

प्रकाशन: 10 Mar 2024 12:07 PM
वाचन संख्या 112

चिंदर गावडेवाडी येथील सभामंडपाचे व बाजारपेठ साईमंदिर येथील सभामंडपाचेही भूमिपूजन ;प्रत्येकी १० लाख रु मंजूर.

आचरा | प्रसाद टोपले : आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून चिंदर तेरई जोड रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे या कामासाठी ६ कोटी १० लाख रु., चिंदर गावडेवाडी हनुमान मंदिर येथे सभामंडप बांधणे या कामासाठी १० लाख रु. ,चिंदर बाजारपेठ साईमंदिर येथे सभामंडप बांधणे या कामासाठी १० लाख रु., चिंदर गावडेवाडी येथे स्ट्रीटलाईट बसविण्यासाठी १ लाख रु. मंजूर केले असून या कामांचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते व शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. चिंदर ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन विकास कामे मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी आ. वैभव नाईक यांचे आभार मानले.

यावेळी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख उदय दुखंडे, उप शहरप्रमुख सन्मेष परब,अवधूत मालणकर, आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे, विभाग संघटक मंगेश टेमकर, समीर हडकर, विनायक परब, करण खडपे, वायंगणी सरपंच रूपेश पाटकर,उप सरपंच ऍड. आस्वलकर , विभाग संघटक पपू परुळेकर,उपविभाग प्रमुख अनिल गावकर, माजी सरपंच सौ भाग्यश्री घागरे, ग्रामपंचायत सदस्य रिया घागरे, मिथुन माळगावकर, दत्ता घागरे, सुभाष सावंत,अमित घागरे,विलास घागरे, उत्तम घागरे, निखिल माळकर,विनोद केळसकर, जगन्नाथ घागरे,शाली घागरे, मिलिंद चिंदरकर, संजय हडपी, वायंगणी माजी सरपंच सौ.संजना रेडकर,निशांत पारकर, प्रकाश वराडकर, दिनकर टोपले, विद्याधर मुणगेकर,चारुशीला आचरेकर, महेश पांचाळ, पांचाळ आदींसह शिवसैनिक व चिंदर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स