ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
जिल्हाप्रशासनाकडून श्री देवी भराडी मंदिर, आंगणेवाडी परिसरात स्वच्छता मोहीम संपन्न.

जिल्हाप्रशासनाकडून श्री देवी भराडी मंदिर, आंगणेवाडी परिसरात स्वच्छता मोहीम संपन्न.

प्रकाशन: 07 Mar 2024 07:39 PM
वाचन संख्या 211

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातल्या आंगणेवाडीतील श्री भराडी देवीची यात्रा २ व ३ मार्च रोजी संपन्न झाली. लाखो भाविकांनी भराडी देवीचे दर्शन घेतले. जत्रेच्या निमित्ताने व्यावसायिकांद्वारे हॉटेल, गृहपयोगी साधने, कपडे, भांडी, खेळाचे साहित्य, मालवणी खाजा, शीतपेय असे शेकडो स्टॉल उभारण्यात आले होते. श्री देवी भराडी जत्रोत्सवाला लाखोंचा जनसागर आणि शेकडो स्टॉल इत्यादीमुळे अर्थातच मोठ्या प्रमाणात कचराही निर्माण झालेला होता. तरी जत्रा संपन्न झाल्यानंतर तेथील संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिल्या होत्या त्यानुसार दिनांक ४ मार्च रोजी आंगणेवाडी येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या स्वच्छता मोहिमेत मालवण नगरपरिषद, सावंतवाडी नगरपरिषद, वेंगुर्ला नगरपरिषद, कणकवली नगरपंचायत, देवगड – जामसंडे नगरपंचायत व कुडाळ नगरपंचायतचे एकूण ४५ कर्मचारी सहभागी झाले होते. सोबतच कचरा वाहतुकीसाठी नगरविकास विभागाकडून एकूण ७ घंटागाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. सकाळी ७:३० वाजता मालवण नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री संतोष जिरगे यांच्यासह मालवण नगरपरिषद, सावंतवाडी नगरपरिषद, वेंगुर्ला नगरपरिषद, कणकवली नगरपंचायत, देवगड-जामसंडे नगरपंचायत व कुडाळ नगरपंचायतचे कर्मचारी मास्क व स्वच्छतेसाठी आवश्यक सामुग्रीसह आंगणेवाडी येथे हजर झाले. त्यानंतर मा. प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री संतोष जिरगे, मा. तहसीलदार श्रीम वर्षा झाल्टे, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, जिल्हा तांत्रिक तज्ञ, नगरविकास विभाग निखिल नाईक, मालवण नगरपरिषद लेखापाल दिनेश राऊत, कार्यालयीन अधीक्षक महेश परब, स्वच्छता निरीक्षक पांडुरंग नाटेकर व विनोद सावंत, आनंद म्हापणकर, शहर समन्वयक अनिकेत चव्हाण, हेमंत आचरेकर यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. आंगणेवाडी विकास मंडळाचे कार्याध्यक्ष श्री सिताराम आंगणे व बीळवस ग्रामपंचायत, ग्रामसेवक श्री युगल प्रभुगावकर यांनी कचरा संकलनासाठी आवश्यक पिशव्या व झाडू तसेच मास्क उपस्थितांना देऊन स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. या स्वच्छता मोहिमेत सविता आश्रमचे ४५ स्वयंसेवक, दादासाहेब वराडकर कॉलेज, कट्टाचे ६० विद्यार्थी व शिक्षक, आर पी बागवे हायस्कूल चे २० विद्यार्थी व शिक्षक, प्राथमिक शाळा, वरवडेचे ५ विद्यार्थी व शिक्षक तसेच आंगणेवाडी ग्रामस्थ सहभागी झाले.

प्रारंभीच स्वच्छता निरीक्षक पांडुरंग नाटेकर व विनोद सावंत यांनी संपूर्ण परिसराचा आढावा घेऊन उपस्थितांचे वेगवेगळ्या गटात विभाजन करून त्यांना वेगवेगळे परिसर वाटून दिले. जमा झालेला कचरा पिशव्यांमध्ये भरून नगरपालिकांच्या घंटा गाड्यांतून ग्रामपंचायत व आंगणेवाडी विकास मंडळाने नेमून दिलेल्या जागेत एकत्र जमा करण्यात आला. कचरा वाहतुकीसाठी जिल्ह्यातील नगरपालिकांकडून ७ गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या या गाड्यांमधून कचरा नियोजीत स्थळी नेला जात होता. या स्वच्छता मोहिमेत एकूण १० टन एवढा कचरा संकलित करण्यात आला असून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला आहे.

आंगणेवाडी विकास मंडळ, मुंबई यांच्याकडून स्वच्छता मोहिमेत सहभागी सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी तसेच नागरिक यासर्वांसाठी सकाळी ११ वाजता अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती त्यानंतर दुपारी २ वाजता मंडळाकडून सर्वांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली. सकळी ८ वाजले पासून दुपारी ४ वाजेपर्यंत चाललेल्या स्वच्छता मोहिमेत उन्हाची तीव्रता लक्षात घेता मंडळाकडून सर्वांना पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती.

स्वच्छता मोहीम संपल्यानंतर आंगणेवाडी विकास मंडळाचे कार्याध्यक्ष श्री बाळा आंगणे, श्री कमलाकर आंगणे, श्री समीर आंगणे, श्री दिनेश आंगणे, श्री प्रसाद आंगणे, श्री सचिन आंगणे, श्री बाळकृष्ण आंगणे यांनी स्वच्छता मोहिमेस उपस्थित सर्वांना श्री भराडी देवीचा प्रसाद व पेन वाटप करून सर्व सहभागी नगरपालिकांचे कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, नागरिक यांचे आभार मानले.

जिल्हाधिकारी श्री किशोर तावडे यांचे विशेष आभार

आंगणेवाडी जत्रोत्सवास दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित असतात अर्थातच यादरम्यान कचराही मोठ्या प्रमाणात तयार होतो. दरवर्षी आंगणेवाडी विकास मंडळ, मुंबई यांच्याद्वारे नियोजन करून सेवाभावी संस्था, ग्रामस्थ, विद्यार्थी यांच्या सहभागाने हा कचरा उचलला जात होता पण यावर्षी मात्र दिनांक २ मार्च रोजी पार पडलेल्या श्री देवी भराडी जत्रोत्सवाच्या निमित्ताने येथील स्वच्छतेसाठी जिल्हाधिकारी यांनी स्वतः विशेष लक्ष दिल्यामुळे व प्रशासनाने सर्वतोपरी केलेल्या सहकार्याबद्दल तसेच यावर्षी पहिल्यांदाच स्वच्छता मोहिमेत जिल्ह्यातील नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांना तसेच कचरा संकलनासाठी घंटागाड्या उपलब्ध करून दिल्याबद्दल आंगणेवाडी विकास मंडळ व आंगणेवाडी ग्रामस्थांकडून जिल्हाधिकारी श्री किशोर तावडे यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 445

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स