ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मसुरे येथील नेत्र चिकित्सा शिबिराचा १३० जणांना लाभ : १०४ जणांना मोफत चष्मा वाटप.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मसुरे येथील नेत्र चिकित्सा शिबिराचा १३० जणांना लाभ : १०४ जणांना मोफत चष्मा वाटप.

प्रकाशन: 04 Mar 2024 05:39 PM
वाचन संख्या 75

मसुरे | प्रतिनिधी : श्रीमती जयश्री रावजी पेडणेकर सेवा ट्रस्ट, पेडणेकर बंधू मसुरे कावावाडी व विजय क्रीडा मंडळ मुंबई यांच्या वतीने मसुरे कावावाडी येथे मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचा १३० जणांनी लाभ घेतला. १०४ जणांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले. शिबिराचे उदघाटन विजय क्रीडा मंडळ अध्यक्ष संतोष कासले यांच्या हस्ते झाले.

यावेळी ट्रस्ट अध्यक्ष शरद पेडणेकर, डॉ दत्ताराम कोरडे, डॉ यादव, शाम धुरी, ऍड केदार जुवेकर, राजन मालवणकर, नारायण पेडणेकर, विनायक सावंत, रामचंद्र धुरी, प्रसाद येसाजी, अरुण आंबेरकर , साई पेडणेकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना विजय क्रीडा मंडळ अध्यक्ष संतोष कासले यांनी ट्रस्टच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. सर्व सामान्य जनतेच्या उपयोगी पडणारे उपक्रम अध्यक्ष शरद पेडणेकर आणि सहकारी राबवित आहेत. त्यांना यापुढेही मंडळाच्या माध्यमातून सहकार्य लाभेल असे ते पुढे म्हणाले.

शिबीर यशस्वीतेसाठी तुळशीदास पेडणेकर,चंद्रकांत पेडणेकर, रुदाली पेडणेकर, पियुश पेडणेकर,सुहास पेडणेकर, निखिल पेडणेकर, दर्शित पेडणेकर, समिर पेडणेकर, सिध्दी पेडणेकर, शरद रा पेड‌णेकर, रमण पेडणेकर, मनिषा हडकर , शितल पेडणेकर, सायली पेडणेकर, साइप्रसाद पेडणेकर, भुपेश पेडणेकर, शोभा पेडणेकर आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. आभार श्रीमती जयश्री रावजी पेडणेकर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष शरद पेडणेकर यांनी मानले.

यावेळी श्रीमती जयश्री रावजी पेडणेकर सेवा ट्रस्ट, पेडणेकर बंधू मसुरे कावावाडी व विजय क्रीडा मंडळ मुंबई यांच्या वतीने मसुरे येथील ज्येष्ठ पत्रकार प्रतिनिधी श्री झुंजार पेडणेकर यांना नुकताच आदर्श ग्रामीण पत्रकारीता पुरस्कार सन्मान प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स