आंगणे कुटुंबियांच्या वतीने माजी नगरसेवक यतीन खोत आणि उद्योजिका सौ. शिल्पा यतीन खोत यांचा सत्कार.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती व माजी शिवसेना नगरसेवक यतीन खोत व उद्योजिका तसेच युवती सेना प्रमुख अधिकारी सौ. शिल्पा यतीन खोत यांचा भराडी देवी यात्रोत्सवात आंगणे कुटुंबियांच्या वतीने सदिच्छा सत्कार करण्यात आला. श्री यतीन खोत व सौ. शिल्पा यतीन खोत यांनी, आपण या सत्काराचा विनम्रपणे स्विकार करत आहोत असे सांगताना आंगणे कुटुंबीयांचे आभार मानले. श्री देवी भराडीचा अखंड आशिर्वाद समस्त मालवण शहरावर आणि कोकणावर राहो अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)