मनसे मालवण तालुकाध्यक्ष प्रीतम विलास गावडे यांचा पदाचा आणि प्राथमीक सदस्यत्वाचा राजीनामा..!
मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अलीकडेच तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्त केलेले युवा उद्योजक प्रीतम विलास गावडे यांनी तालुकाध्यक्ष पद आणि मनसे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा दिला आहे. प्रीतम विलास गावडे यांच्या सहकारी कार्यकर्त्यांनी देखील पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचे समजते. प्रीतम विलास गावडे हे आज संध्याकाळीच आपली नवीन राजकीय दिशा जाहीर करणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)