श्री. मनोज मोंडकर व सौ. पूनम चव्हाण यांच्या माध्यमातून भराडी माता दर्शनाला भाविकांसाठी बस सेवा ; प्रभाग क्र. ९ मधील भाविकांसाठी विशेष उपक्रम.
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील नगरपरिषद प्रभाग क्र. ९ मधील आई भराडी भक्तांसाठी मनोज मोंडकर व शिवसेना महिला आघाडी तालुका समन्वयक पूनम चव्हाण यांच्या सहकार्याने बस सेवा उपक्रम राबवण्यात आला.
आज २ मार्च २०२४ भराडी यात्रोत्सव निमित्त ही विशेष सोय करण्यात आली. या उपक्रमाचा शुभारंभ मधुकर लुडबे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी श्री. मनोज मोंडकर सौ. पूनम चव्हाण, किशोर गांवकर , मोहन मराळ, प्रसाद आडवणकर, रविना लुडबे ,भाई लुडबे ,संतोष लुडबे, तळवडेकर व अन्य उपस्थित होते. पहाटे ५ वाजल्यापासून ही सेवा सुरु करण्यात आली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)