मालवण शहरात २२ विकासकामे मंजूर करुन दिल्याबद्दल पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि कुडाळ मालवण विधानसभा संयोजक निलेश राणे यांचे मालवण शहर भाजपाच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी मानले आभार.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी मालवण शहर भाजपाच्या वतीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण व माजी खासदार निलेश राणे यांचे प्रसिद्धी पत्राद्वारे आभार व्यक्त केले आहेत. मालवण शहरासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शिफारसी अनुसरून नगरोत्थान व जिल्हा नियोजन विशेष निधीतून २२ विकास कामे मालवण शहरामध्ये मंजूर करून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री रवींद्र चव्हाण व भाजपा नेते व माजी खासदार निलेश राणे ( मालवण कुडाळ विधानसभा संयोजक) निलेश राणे यांचे भारतीय जनता पार्टी मालवण शहराच्या वतीने आभार व्यक्त केले आहेत.
मालवण शहरांतील जनतेला आवश्यक असणारी विकास कामे भारतीय जनता पार्टी मार्फत महायुतीचे सरकार आल्यानंतर कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करत आहे असे प्रसिद्धी पत्राद्वारे नमूद करताना विजय केनवडेकर यांनी सांगितले आहे की या कामांसाठी आवश्यक असणारी शासकीय कागदपत्रे यांचा वेळोवेळी पाठपुरावा भारतीय जनता पार्टी मार्फत करण्यात आलेला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांची विशेष बैठक पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या कक्षात घेऊन या संदर्भात मालवण शहरातील होणारी कामे ही दर्जेदार कामे झाली पाहिजे आणि अशी कामे न झाल्यास त्याच्यावर पूर्णपणे कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट आदेश पालकमंत्री यांनी दिले आहेत असे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. मालवण शहरातील विकास कामे मीच मंजूर केली असे भासवण्याचा प्रयत्न विरोधी पक्षातील माजी नगरसेवक करताना निदर्शनात येत आहे. यासंबंधी ठेकेदारांना धरून अशा प्रकारची कामे कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्न झाल्यास यासंबंधी लेखी तक्रार पालकमंत्री यांच्याकडे भारतीय जनता पार्टी मार्फत करण्यात येणार आहे असे सांगताना केनवडेकर यांनी सांगितले आहे की, ‘ॲडव्हान्स तांत्रिक मंजुरी करून घेणे म्हणजे विकास काम मंजूर करणे’, असे होत नाही. असे करून विकास कामे मीच आणले असे भासवण्याचा प्रयत्न विरोधी माजी नगरसेवक करताना निदर्शनास येत आहे .असे झाल्यास प्रशासनाची तक्रार करण्यास भाजपा मागे पुढे पाहणार नाही असा इशाराही केनवडेकर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे दिला आहे. मालवणात अत्याधुनिक अशा ऐतिहासिक कलादालनासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत तीन कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याचा पालकमंत्री यांनी शब्द दिला आहे. यासंबंधी मालवण नगरपालिका प्रशासन व पालकमंत्री यांची सभा संपन्न झाली आहे. या संदर्भातही पाठपुरावा भाजपा मालवण शहर करीत आहे. राजकोट किल्ला व छत्रपतीचा पुतळ्याजवळील नागरिकांच्या सुविधांसाठी पर्यटन विभागामधून वेगळा निधी जिल्हा नियोजन मध्ये मंजूर करून देण्यासाठी निर्देश पालकमंत्री यांनी दिले असल्याचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)