आंगणेवाडी यात्रेच्या पार्श्वभूमीवर माऊली मित्र मंडळाच्या वतीने पोलिसांना पाणी बाॅटलचे वाटप.
मालवण | प्रतिनिधी : आंगणेवाडी भराडी देवी च्या जत्रोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना सिंधुदुर्ग पोलीस चांगली सेवा देतात.तसेच दिवस रात्र बंदोबस्तात वाहतुकीचे सुरळीत नियोजन करुन प्रवास सुरळीत करतात. या पार्श्वभूमीवर आज कणकवली येथील माऊली मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी कणकवली श्री. किशोर सावंत यांची भेट घेतली आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून पोलिस बांधवांसाठी पाणी बाॅटल माऊली मित्र मंडळाच्या वतीने सुपूर्द केल्या. यावेळी कणकवली पोलिस स्टेशन चे प्रभारी पोलिस निरीक्षक मनोज पाटील आणि पोलिस कर्मचारी यांच्यासह माऊली मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर, सुभाष उबाळे, अविनाश गावडे, प्रभाकर कदम, आदी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर म्हणाले की, दिवसभर उन्हात बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिस बांधवांचा घसा ही यावेळी कोरडा पडतो. पोलिस हे सुद्धा माणूसच आहेत व या माध्यमातून माऊली मित्रमंडळाने सद्भावनेचा ओलावा निर्माण केला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)