ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
असलदे ते कोळोशी स्वच्छता मोहीम : गाडगेबाबा जयंतीचे औचित्य.

असलदे ते कोळोशी स्वच्छता मोहीम : गाडगेबाबा जयंतीचे औचित्य.

प्रकाशन: 25 Feb 2024 06:51 PM
वाचन संख्या 108

तळेरे | निकेत पावसकर : संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलदे येथील स्वस्तिक फाऊंडेशनच्या दीविजा वृद्धाश्रम, कोळोशी येथील शिवप्रतिष्ठान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी असलदे ते कोळोशी बस स्थानक पर्यंतचा रस्ताबाजुची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये दीविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबा, कर्मचारी वर्ग व शिवप्रतिष्ठान कोळोशी मंडळ चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या स्वच्छता मोहीमेत दिविजा वृद्धाश्रम असलदे ते कोळोशी बाजारपेठ पर्यंत जाणार्या मार्ग परिसरात साफ सफाई करण्यात आली. स्वच्छता असे जेथे, आरोग्य वसे तेथे व माझा गाव स्वच्छ गाव अशा घोषणा देत समाजाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. स्वस्तिक फाऊंडेशनचे सेक्रेटरी संदेश शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम कार्यक्रम करण्यात आला.

दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबा व कर्मचारी व शिवप्रतिष्ठान कोळोशी मंडळ यांच्या सहकार्यामुळे परिसरातील प्लॅस्टिक कचरा व प्लॅस्टिक बॉटल उचलून या कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली गेली. या कार्यक्रमासाठी दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबा व कर्मचारी वर्ग तसेच शिवप्रतिष्ठान कोळोशी मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स