ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
तर फोवकांडा पिंपळावरच्या गार्डनची वाताहात लागली नसती ; माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांची नगरपरिषद प्रशासनावर टीका.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

तर फोवकांडा पिंपळावरच्या गार्डनची वाताहात लागली नसती ; माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांची नगरपरिषद प्रशासनावर टीका.

प्रकाशन: 24 Feb 2024 03:11 PM
वाचन संख्या 203

पूर्वी शहरातील सौंदर्यात भर घालणारे एक सुशोभित स्थळ व परीसर आता डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्याच्या दृष्टीने संवेदनशील बनत असून प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची व्यक्त केली खंत ; फोवकांडा पिंपळावरील रिक्षा मंडळाचे बांधव, सध्या स्वयंस्फूर्तीने गार्डनची यथाशक्ती देखभाल करत असल्याचेही केले स्पष्ट.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी, फोवकांडा पिंपळ गार्डनच्या सध्याच्या अवस्थेबद्दल नगरपरिषद प्रशासनावर प्रसिद्धी पत्रकाद्वारे टीका केली आहे. मालवण शहराच्या मध्यवर्ती असलेल्या फोवकांडा पिंपळ येथे मालवण नगर परिषदेचे हे गार्डन आहे.

महेश कांदळगांवकर यांनो केलेल्या आरोपात त्यांच्या व सहकारी नगरसेवकांच्या लोकप्रतिनिधी म्हणून सेवेच्या कालावधी मध्ये, या गार्डनचे सुशोभीकरण करण्यात आले होते. त्यात रंगीत कारंजा, डेकोरेटिव्ह लाईटस् असे शहरासाठी सुशोभनीय घटक होते. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे गार्डन असल्याने पर्यटन दृष्ट्या सौदर्य वाढविणारे आहे असा विचार करुन ते पाऊल उचलले गेले होते. परंतु आता तेच गार्डन मागील दीड वर्षांपासून समस्या ग्रस्त आहे. त्यातील रंगीत कारंजा बंद आहे. तिकडे कारंज्याच्या साचलेल्या पाण्यात डासांच्या अळ्या झालेल्या आहेत हे आरोग्यदृष्ट्या संवेदनशील. प्रवेशाचे फाटक मोडलेले आहे. डेकोरेटिव्ह दिवे बंद आहेत व याबाबत मागील दीड वर्ष आवाज उठवूनही अद्याप काहीही कार्यवाही झालेली नाही अशी खंत असल्याचेही माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी नमूद केली आहे. एकीकडे आपल्या जिल्ह्यातील नगर पालिका स्वच्छ सर्वेक्षण मध्ये बक्षीस मिळवत असताना मालवण नगर पालिका सुशेगात आहे. ती मालवणच्या लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे असा आरोप करत त्यांनी धूर फवारणी, औषध फवारणी करून डासांची उत्पत्ती स्थानके नष्ट करणे आवश्यक असताना याबाबत कुठलीही उपाययोजना केली जात नाही असेही सांगितले आहे. उलट सुशोभीकरण केलेल्या ठिकाणी अस्वच्छता होताना दिसत आहे. या ठिकाणची स्वच्छता करणाऱ्या ठेकेदारावर कुणाचा अंकुश नाही. त्याच्यावर दंडात्मक कारवाई केल्याचे दिसत नाही. सध्या या ठिकाणी फोवकांडा रिक्षा मंडळाच्या बांधवांकडून स्वयंस्फूर्तीने व यथाशक्ती देखभाल सुरु आहे असे महेश कांदळगांवकर यांनी स्पष्ट केले आहे.

फक्त एक दिवसाचे स्वच्छतेचे इव्हेंट करायचे ,त्यामध्ये नागरिकांना, संस्थांना सहभागी करून घेऊन फक्त शासनाला दाखविण्या इतपत फोटो सेशन करून घेतले जात आहे. एखाद्या कामाबाबत मागील दिड वर्षेपासून सातत्याने सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असेल तर मुख्याधिकारी हे मनमानी पद्धतीने काम करीत आहेत आणि त्याच्यावर कोणाचाही अंकुश नाही हे सिद्ध होत आहे .आम्ही केलेल्या सूचनांची कात्रण करून फाईलला लावण्यापेक्षा केबिन सोडून जर प्रत्यक्ष जाऊन कामाची पाहणी केली असती तर आमच्या काळात सुशोभीकरण केलेल्या एका गार्डनची असेहि वाताहत लागली नसती असे महेश कांदळगांवकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स