साई आधार प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने पालघर येथील झुगेरपाडा येथे शिवजयंती सोहळा साजरा.
झुगरेपाड्यातील ग्रामस्थांना घरोघरी जाऊन केले ब्लॅंकेटचे वाटप…!
शिरगांव | संतोष साळसकर : साई आधार प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने सामाजिक शिवजयंतीचे औचित्य साधून शिवकार्य मोहीम संपन्न झाली. झुगरेपाडा तालुका वाडा, पालघर या ठिकाणी १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. या शिवकार्य मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन उपस्थित ग्रामस्थ,शिक्षक तथा संस्थेचे पदाधिकारी सदस्य यांच्या वतीने करण्यात आले. जिल्हापरिषद शाळा झुगरेपाडा मधील शालेय विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य भेट म्हणून देण्यात आले. तसेच झुगरेपाड्यातील ग्रामस्थांना घरोघरी जाऊन ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले व या दरम्यान संस्थेच भूपतगडालाही भेट देण्यात आली. या प्रसंगी शाळेतील शिक्षक महेंद्र कराळे सर, संगीता ठाकरे मॅडम,अनंता बोंद्रे सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश पागी, महिला सदस्य आशा सापटे, आरोग्य कार्यकर्ता लक्ष्मण झुगरे, वनिता झुगरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
साई आधार प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विशाल राणे , कार्याध्यक्ष श्री अनिल तेजम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिवकार्य मोहीम राबविण्यात आली. तसेच संस्थेचे खजिनदार अमोल चव्हाण, सूरज गुंजाटे, योगेश माटल, विनोद शिंदे, अमित राऊळ, ऋतुराज घाडी, दीपक निमदे, प्रवीण माटल, विनायक शिर्के,साई राऊळ यांनी सदर मोहिमेत सहभाग घेतला. ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केले त्या सर्व शिवभक्तांचे संस्थापक विशाल राणे यांनी प्रतिष्ठानच्या वतीने आभार मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)