मुख्यमंत्री, 'माझी शाळा, सुंदर शाळा' तालुकास्तर मूल्यमापन स्पर्धे मध्ये जि.प. प्राथमिक शाळा विद्यामंदिर सांगुळवाडी नं.1 चे घवघवीत यश.
वैभववाडी प्रतिनिधि/वैभववाडी तालुकास्तर मूल्यमापन स्पर्धे मध्ये जि.प.प्राथमिक शाळा विद्यामंदिर सांगुळवाडी नं.1 ही शाळा तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकावर आली आहे.
या अभियानात प्रथम क्रमांका वर येऊन रूपये तिन लाखाचे बक्षीस संपादन केले आहे. तसेच सदर शाळेची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शाळेतील मुख्याध्यापीका सौ स्नेहलता मॅडम, सर्व शिक्षक तसेच सर्व पालक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सर्व सदस्य विशेष प्रयत्न व साथ नेहमीच सांगुळवाडी ग्रामस्थ विद्या प्रसारक संघ याची राहीलेली आहे. पुढील विविध कार्यक्रमासाठी पण सदैव राहील याची खात्री आहे. आणी त्यात वाढ होईल( देणगीदार तसेच समर्थक) शाळेला पुढील जिल्हास्तरीय मूल्यमापनास स्पर्धे साठी स्नेहपुर्वक खुप खुप शुभेच्छा. या सर्वांचे सांगुळवाडीतील ग्रामस्थां तर्फे तसेच हितचिंतकां तर्फे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. शुभेच्छुक,सांगुळवाडी ग्रामस्थ विद्या प्रसारक संघ,मुंबई
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)