पळसंब शाळा क्र . १ येथे क्रिडा साहित्याचे वाटप.
श्रीमती मंदा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसंब यांच्या वतीने संपन्न झालेला कार्यक्रम.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब शाळा क्र.१ येथे १६ फेब्रुवारीला क्रिडा साहित्य वाटप करण्यात आले.
पळसंब गावठणवाडी येथील पळसंब शाळा क्र. .१ च्या माजी विध्यार्थीनी श्रीमती .मंदा लक्ष्मण जाधव यांनी रोख रक्कम ५००० / – रुपये श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळाकडे देणगी स्वरुपात दिली होती. श्रीमती मंदा जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्या रक्कमेतून मंडळाने बुद्धीबळ , लगोरी , बास्केट बॉल ,क्रिकेट बॅट , स्टॅम्प , टेनिस बॉल , फुटबॉल , हॉलीबॉल , हॉलीबॉल नेट, रस्सीउडी, सापशिडी असे क्रिडा साहित्य खरेदी करत पळसब शाळेत ते सुपूर्द केले. श्रीमती .मंदा जाधव यांचे माजी सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर यांनी कौतुक केले. शाळेच्या सुख दुःखात प्रत्येक उपक्रमात पळसंब गांव व शाळेचे माजी विद्यार्थी ताठ मानेने उभे राहतीत फक्त हाक मारा असे मनोगतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. विनोद कदम व सहशिक्षिका आभार श्रीमती मंदा जाधव व श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ यांचे मानले.
श्रीमती मंदा लक्ष्मण जाधव या श्री.जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळाचे आजिव सभासद श्री पर्शुराम जाधव यांच्या बहिण आहेत. यावेळी देवस्थान मानकरी श्री राजन पुजारे जयवंत पुजारे ,शाळा शिक्षण समिती अध्यक्ष श्री. रविकांत सावंत उपाध्यक्ष श्री रमेश मुणगेकर मंडळाचे अध्यक्ष श्री उल्हास सावंत उपाध्यक्ष श्री अमरेश पुजारे ,सचिव व माजी सरपंच श्री . चंद्रकांत गोलतकर श्री. शेखर पुजारे मनसे शाखा अध्यक्ष रुपेश पुजारे, मुंबईहून अनिकेत परब हे हे उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)