ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
चाफेड येथे नैसर्गिक शेती संदर्भात शेतकरी मार्गदर्शन सभा.

चाफेड येथे नैसर्गिक शेती संदर्भात शेतकरी मार्गदर्शन सभा.

प्रकाशन: 16 Feb 2024 07:03 AM
वाचन संख्या 127

शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
देवगड तालुक्यातल्या चाफेड भोगलेवाडी येथे पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती योजना अंतर्गत शेतकरी सभा आयोजित करण्यात आली. या सभेला तालुका कृषी तंत्र व्यवस्थापक निकेतन राणे, कृषी सहाय्यक एच.एच. सलगरकर, कृषी सल्लागार मयूर सावंत, गावचे सरपंच किरण मेस्त्री, ग्रा. पं. सदस्य सुनील कांडर, पंढरीनाथ कांडर, सत्यवान कांडर, संतोष भोगले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. तालुका कृषी तंत्र व्यवस्थापक राणे यांनी पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती योजनेचे उद्दिष्ट तसेच गट तयार करणे संदर्भात शेतकरी निवडीचे निकष याबाबत आणि गट अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध बाबी याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना गट तयार करताना प्रस्तावासाठी लागणारी कागदपत्रे याबत माहितीही सांगितली. तसेच ५० हेक्टर क्षेत्र निश्चित करून शेतकऱ्यांची यादी तयार करण्यास सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स