माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली होणार्या सा. बां. कार्य. अभियंता कणकवली येथील आंदोलनाला मालवणातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार : विनोद सांडव. .
मालवणातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार : विनोद सांडव.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणात ४ डिसेंबरला साजर्या झालेल्या नौसेना दिन सोहळ्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या हॅलीपॅड तसेच रस्ते, किल्ला उभारणी आणि अन्य कामात मध्ये घोटाळा झाला आहे. कामे योग्य पद्धतीने झालेली नाहीत असे चित्र दिसून येत आहे. या कामाची माहितीही कार्यकारी अभियंता देत नाहीत. त्यामुळे या बाबत जनतेचा आवाज बनून माजी आमदार परशुराम उपरकर १५ फेब्रुवारी रोजी सा.बां. कार्यकारी अभियंता कार्यालय कणकवली येथे आंदोलन छेडणार आहेत. या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याच्या भावना जनतेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणवार प्राप्त होत आहेत. कार्यकर्तेही उत्स्फूर्त पणे पाठिंबा देत आहेत.
मात्र आंदोलन लोकशाही व शांततेच्या मार्गाने करून जोपर्यंत अधीक्षक अभियंता उपस्थित राहून सर्व मागण्या ऐकून घेत चर्चा करणार नाहीत तोपर्यंत, वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्फत समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे माजी आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर यांनी आले आहे. जनतेच्या किंवा कुठल्याही कामात पारदर्शकपणा असली पाहिजे. जनतेच्या पैशाचा योग्य वापर झालाच पाहिजे. काम नियमानुसार योग्य पद्धतीने असले पाहिजे. हीच आमची भूमिका राहणार आहे असेही सांगण्यात आले आहे. झालेल्या कामांची उच्च यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी, भूमिका राहणार आहे असेही स्पष्ट करण्यात आले.
मालवण तालुक्यातून या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित रहाणार असल्याचे राजकीय व सामाजिक कार्यकर्ते विनोद सांडव यांनी सांगितले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)