ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
चाफेड गावात गवा रेड्यांचा वावर ; वायंगणी शेतीचे नुकसान.

चाफेड गावात गवा रेड्यांचा वावर ; वायंगणी शेतीचे नुकसान.

प्रकाशन: 13 Feb 2024 10:37 AM
वाचन संख्या 137

शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
देवगड तालुक्यातल्या चाफेड पिंपळवाडी भागात सध्या गवा रेड्यांचा मुक्तपणे वावर सुरू आहे. या गवा रेड्यानी येथील अनेक शेतकऱ्यांच्या वायंगणी शेतीत घुसून कुळीथ, चवळी, उडीद, भुईमूग शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केलें आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. याबाबत येथील शेतकऱ्यांनी सरपंच किरण मेस्त्री यांना माहिती दिली असता सरपंच आणि पोलीस पाटील संतोष सावंत यांनी तातडीने पिंपळवाडी येथील उंचवळा याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीचा पंचनामा घातला. यात सुमारे ५० ते ६० हजाराचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

यावेळी सरपंच किरण मेस्त्री, पोलीस पाटील संतोष सावंत, ग्रामपंचायत सदस्य सुदर्शन उर्फ नागेश साळकर, विजय पाटील, प्रदीप घाडी, रमेश राणे, प्रकाश पाटील, प्रशांत साटम, सौ. सुवर्णा पांचाळ, दाजी पाटील, मंगेश साळकर, दीपक राणे, वसंत पांचाळ, तुकाराम घाडी, कुलदीपक घाडीगावकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स