ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
मसुरेतील मूर्तिकार आशिष खोत, चिंकू खोत यांचा सन्मान ; कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ व आंबेरी भंडारी समाज संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत कार्यक्रम.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मसुरेतील मूर्तिकार आशिष खोत, चिंकू खोत यांचा सन्मान ; कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ व आंबेरी भंडारी समाज संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत कार्यक्रम.

प्रकाशन: 07 Feb 2024 12:24 AM
वाचन संख्या 222

भंडारी समाजातील सुमारे ५० मूर्तिकार व ६ आयुर्वेदिक वैद्य सन्मानित.

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आंबेरी येथे कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ व आंबेरी भंडारी समाज संघ यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारी समाजातील गणेश मूर्तिकार व आयुर्वेदिक वैद्य यांचा नुकताच सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमावेळी भंडारी समाजातील सुमारे ५० मूर्तिकार व ६ आयुर्वेदिक वैद्य यांचा शाल श्रीफळ गुलाबपुष्प सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये मसुरेतुन कावावाडी येथील आशिष खोत, व टोकळवाडी येथील चिंकू खोत या मुर्तीकाराना सन्मानित करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष मामा माडये, आंबेरी सरपंच मनमोहन डीचोलकर, भंडारी समाज अध्यक्ष आंबेरी राजन सारंग, कुणकवळे माजी सरपंच आनंद वराडकर, माजी प. स. सदस्या श्रध्दा केळुसकर, तळगाव सरपंच लता खोत, वराडकर हायस्कूल कट्टा मुख्याध्यापक संजय नाईक, दिलीप वेंगुर्लेकर, प्रदीप आवलेगावकर, ऍड. प्रदीप मिठबावकर, सुरेश कांबळी, निलेश हडकर, गणेश वाईरकर, विद्याधर चिंदरकर, भाई आचरेकर, प्रवीण जावकर, सुशांत वाक्कर, किशोर वाक्कर, शरद केळुसकर, दिलीप खोत, बाबू कांबळी, पो. पा. दिलीप राऊत, सागर राऊत, अंकुश मांजरेकर, शशिकांत पाटकर व अन्य समाज बांधव मूर्तिकार, वैदय महिला वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी उपस्थित असलेल्या कार्यकारिणी सदस्य, युवा पिढीचे समाज बांधव यांनी पुढाकार घेऊन समविचारी लोकांना एकत्र आणून असेच दर्जेदार कार्यक्रम यापुढे देखील केले जातील असे जाहीर केले. यावेळी मामा माडये, संजय नाईक, मनमोहन डीचोलकर, राजन सारंग, मूर्तिकार संतोष नागवेकर, सुरेश कांबळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. प्रदीप मिठबावकर, गणेश डिचोलकर तर आभार श्रध्दा केळुसकर यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स