सौरभ ताम्हणकर मित्रमंडळ, मालवण यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त मालवण तालुकास्तरीय चित्रकला व रांगोळी स्पर्धा ; दोन विविध गटांत संपन्न होणार उपक्रम.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातच्या सौरभ ताम्हणकर मित्रमंडळ यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त मालवण तालुकास्तरीय चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन गटानं मध्ये संपन्न होणार आहे. पहिला लहान गट १५ वर्षा खालील तर दुसरा मोठा गट खुला गट असणार आहे. ही स्पर्धा मेढा राजकोट येथील राजकोट किल्ल्यावर १८ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता सुरु होईल. या स्पर्धेचे विषय चित्रकला व रांगोळी स्पर्धेसाठी ‘श्री राम भूमी अयोध्या नगरी व छत्रपती शिवाजी महाराज’ असून या दोन विषयांवर स्पर्धकांना कला सादर करायची आहे. चित्रकला स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांसाठी ड्रॉईंग पेपर आयोजकांना कडून देण्यात येईल. स्पर्धेत प्रथम तीन विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व सन्मानचिन्न देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेचे बक्षीस वितरण १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त राजकोट येथे करण्यात येणार आहे. स्पर्धेकांनी नांव नोंदणी करिता अंतिम १७ फेब्रुवारी राहील. स्पर्धे संदर्भातील अधिक माहिती करीत ९२०९३३३०१२ या क्रमांकावर संपर्क साधावा अशी माहिती सौरभ ताम्हणकर मित्रमंडळ यांच्याकडून देण्यात आली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)