ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
बांदा शिवप्रेमी मंडळाच्या वतीने शिवजयंती कार्यक्रम नियोजन बैठक संपन्न ; भव्य चित्ररथ स्पर्धा असणार खास आकर्षण.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

बांदा शिवप्रेमी मंडळाच्या वतीने शिवजयंती कार्यक्रम नियोजन बैठक संपन्न ; भव्य चित्ररथ स्पर्धा असणार खास आकर्षण.

प्रकाशन: 07 Feb 2024 04:38 PM
वाचन संख्या 79

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या ञबांदा शिवप्रेमी मंडळाच्या वतीने दरवर्षी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येतो. बांदा गावातील सर्व ग्रामस्थ एकत्रित येत हा शिवजयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करतात.या वर्षीही हा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार असल्याने यासंदर्भात नियोजन करण्यासाठी ची सभा श्री.देवी भुमिका मंदिर येथे संपन्न झाली. यावर्षी या कार्यक्रमात मुख्य खास आकर्षण म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भव्य खुली चित्ररथ स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग व गोवा राज्यातील चित्ररथ सामील होणार आहेत.या स्पर्धेत सहभागी संघांना रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच लहान मुलांच्या वेशभुषा स्पर्धेत सुद्धा बक्षिसे देण्यात येणार आहे. सकाळी शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानंतर गडगेवाडी येथील शिवपुतळ्याकडून चित्ररथ व रॅली पुर्ण बांदा शहर व बांदेश्वर मंदिर पर्यंत काढण्यात येणार आहे. असे विविध कार्यक्रम यानिमित्ताने आयोजन करण्यात येणार आहेत.

या सभेला बांदा सरपंच प्रियांका नाईक, बांदा मराठा समाज अध्यक्ष विराज परब, बांदा मराठा समाज माजी अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत, माजी सरपंच मंदार कल्याणकर, माजी उपसरपंच जावेद खातिब, ग्रा.पं.सद-या रुपाली शिरसाट, सामाजिक कार्यकर्ते पापु उर्फ निलेश कदम, राजेश सावंत, सर्वेश गोवेकर, फिरोज खान, हेमंत मोर्ये, बांदा मराठा समाज माजी खजिनदार राकेश परब, संजय सावंत, बांदा मराठा महिला समाज अध्यक्षा स्वाती सावंत, बांदा मराठा समाज समन्वयक लक्ष्मी सावंत,माजी पं समिती सदस्या राखी कळगुंटकर, दीक्षा सावंत, ममता सावंत, अस्मिता माजगावकर, शैलेश केसरकर, राकेश केसरकर जयप्रकाश सावंत आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अंतिम नियोजन करण्यासाठी गुरुवार दिनांक ०८ फ्रेब्रुवारी रोजी सभा घेण्यात येणार आहे. या सभेत बांदा शिवप्रेमी यांची शिवजयंती उत्सव कमिटी तयार करण्यात येणार आहे तरी जास्त जास्त संख्येने या सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स