ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सद्गुरू परमहंस बाबा भालचंद्र महाराज विद्यालयाला सढळ हस्ते देणगी ; माऊली मित्रमंडळाशी संलग्न असलेल्या शालेय मित्रमंडळाचा 'ग्रंथसंपदा जतनाचा' उद्देश.

सद्गुरू परमहंस बाबा भालचंद्र महाराज विद्यालयाला सढळ हस्ते देणगी ; माऊली मित्रमंडळाशी संलग्न असलेल्या शालेय मित्रमंडळाचा 'ग्रंथसंपदा जतनाचा' उद्देश.

प्रकाशन: 05 Feb 2024 03:24 PM
वाचन संख्या 130

कणकवली | अविनाश गावडे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे आज दिनांक ०५ फेब्रुवारीला संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या माऊली मित्र मंडळाशी संलग्न असलेल्या ‘शालेय मित्र मंडळाच्या’ वतीने सद्गुरू परमहंस बाबा भालचंद्र महाराज विद्यालय शाळा क्रमांक ३ ला सढळ हस्ते देणगी स्वरुपात रक्कम देण्यात आली. शालेय मित्र मंडळाचे अध्यक्ष व माऊली मित्र मंडळ, संलग्न मित्र मंडळांचे सल्लागार संजय मालंडकर यांच्या नेतृत्वाखाली शालेय मित्र मंडळाच्या पदाधिकारी सौ संगीता वाळके ( डेगवेकर), दया वाळके ( बोभाटे) यांच्या हस्ते शाळा नंबर ३ च्या मुख्याध्यापिका श्रीमती करंबेळकर मॅडम व शिक्षक वर्गाच्या उपस्थितीत पुस्तकालयातील पुस्तके जतन करून ठेवण्यासाठी कपाट खरेदी करिता देणगी स्वरुपात रोख रक्कम सुपूर्द करण्यात आली,

याप्रसंगी संजय मालंडकर यांनी असे म्हटले की, आम्ही याच शाळेमध्ये पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण घेतले आणि बाबा भालचंद्र महाराज यांच्या नावाने पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या शाळेचे नाव सर्वदूर पसरले असून, तुम्ही सुध्दा आम्ही दिलेल्या पुस्तकांचे वाचन करून मनन करून, इतरही विद्यार्थी वर्गाला आवड निर्माण करा, उत्तम प्रकारे शिक्षण घेऊन शाळेचे नाव उज्ज्वल करा,

बाबा भालचंद्र महाराज यांच्या ४६ व्या पुण्यतिथी च्या वेळी ” पुस्तकालया साठी माऊली मित्र मंडळाचे वतीने “पुस्तके देण्यात आली होती. त्यावेळी शाळेच्या वतीने पुस्तके ठेवण्यासाठी कपाटाची आवश्यकता आहे, असे म्हटले होते आणि म्हणूनच १९७६ / ७७ च्या माजी विद्यार्थी वर्गाने आज शाळेला भेट दिली, आणि देणगी स्वरुपात रक्कम सुपूर्द केली, तसेच याही पुढे जेव्हा जेव्हा आमच्या शाळेच्या आवश्यकतेनुसार आम्ही जरुर मदत करू,तसेच या शाळेतील माजी विद्यार्थी वर्गाने भेटी देऊन, आवश्यक ती मदत करावी, शाळेच्या परिसरात विज्ञान कक्षा करिता , आणि इतर काही सुविधांचा अभाव असल्यास शासकीय दरबारी मागणी करून जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी केले,

यावेळी शिक्षक वर्गाने माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले,
श्रीमती सविता पाटील, विवेक मुंज, सत्यवान हुले, प्रकाश चव्हाण, सुनिल वर्दम, जयवंत सोहनी, सुनिल काणेकर, सुनिल सागवेकर, सौ संगीता तायशेट्ये, सौ मंजिरी काणेकर, सौ अनुराधा मांजरेकर, सौ साधना आळवे ( तेली) आदी माजी विद्यार्थी उपस्थितीत होते, ( विद्यामंदिर हायस्कूल या १९८१/८२ ) चे विद्यार्थी विद्यार्थिनीं यात समाविष्ट होते. शाळा नंबर ३ चे सर्व शिक्षक , शिक्षिका उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स