ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
मालवण पत्रकार समितीचे पुरस्कार ; महेंद्र पराडकर, झुंजार पेडणेकर, प्रशांत हिंदळेकर यांना मानाचे पत्रकार पुरस्कार जाहीर.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मालवण पत्रकार समितीचे पुरस्कार ; महेंद्र पराडकर, झुंजार पेडणेकर, प्रशांत हिंदळेकर यांना मानाचे पत्रकार पुरस्कार जाहीर.

प्रकाशन: 05 Feb 2024 02:51 PM
वाचन संख्या 122

डॉ. दीपक परब यांचा मालवणरत्न आणि तारक कांबळी यांचा कलारत्न म्हणून होणार सन्मान.

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने दिले जाणारे पत्रकार पुरस्कार तसेच मालवणरत्न व कलारत्न हे दोन विशेष पुरस्कार निवड समिती आणि तालुका कार्यकारणी यांच्या संयुक्त बैठकीत एकमताने निवड झाली. अध्यक्ष संतोष गावडे यांनी हे जाहीर केले आहे. १५ फेब्रुवारीला विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचा वितरण सोहळा संपन्न होणार आहे.

जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये कै. नरेंद्र परब स्मृती पुरस्कार पत्रकार महेंद्र पराडकर, कै. भाईसाहेब खांडाळेकर स्मृती पुरस्कार पत्रकार झुंजार पेडणेकर आणि पत्रकार अमित खोत पुरस्कृत ‘बेस्ट स्टोरी अवार्ड’ हा विशेष पुरस्कार पत्रकार प्रशांत हिंदळेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान मालवण पत्रकार समितीच्या वतीने यावर्षी पासून मालवणरत्न व कलारत्न हे दोन नवीन विशेष पुरस्कार सार्वजनिक क्षेत्रात आदर्शवत यश संपादन केलेल्या दोन व्यक्तीना दिले जणार आहेत. यातील मालवणरत्न या पुरस्कारासाठी मसुरे गावचे सुपुत्र डॉ. दीपक मुळीक-परब तर कलारत्न या पुरस्कारासाठी रेवंडी गावचे सुपुत्र श्री. तारक कांबळी यांची निवड पुरस्कार निवड समिती व तालुका कार्यकरणी यांच्या वतीने एकमताने करण्यात आली.

मालवण तालुका पत्रकार समिती कार्यकारणी व पुरस्कार निवड समिती यांच्या बैठकीत पुरस्कार निवड निश्चित झाली. यावेळी अध्यक्ष संतोष गावडे, सचिव सौंगंध बादेकर, विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष विद्याधर केनवडेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश सरनाईक, डिजिटल मीडिया सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष अमित खोत, तालुका उपाध्यक्ष कृष्णा ढोलम, तालुका उपाध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, खजिनदार सिद्धेश आचरेकर, सहसचिव संदीप बोडवे, प्रशांत हिंदळेकर, कुणाल मांजरेकर, नितीन गावडे, सुधीर पडेलकर उपस्थित होते.

पुरस्कार वितरण सोहळ्यात मालवण पत्रकार समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा यांचा पारितोषिक वितरण तसेच पत्रकार गुणवंत पाल्य यांचेही सत्कार केले जाणार आहेत. अशी माहिती अध्यक्ष संतोष गावडे व सचिव सौंगंध बादेकर यांनी दिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स