सिंधुदुर्ग जिल्ह्यात 'मानवी हक्क आणि संरक्षणासाठी' धडपडणार्या माणसांचा संघटनेचा मेळावा…अर्थात् ह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनचा जिल्हास्तरीय मेळावा व कार्यशाळा.
मालवण | सुयोग पंडित : जिल्ह्यात आता ‘ह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शन, ’ या संस्थेचे विविध सामाजिक उपक्रम तथा चळवळ सात्विकतेने आकार घेत आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यातल्या त्यांच्या पदाधिकारी व सदस्यांची आपापाली प्रपंचाची कामे सांभाळून या संघटनेसाठी आरोग्य, शिक्षण, समाज जागरण आणि विविध स्तरांतील कामांची प्रशंसा सुद्धा होत आहे. खरेतर मानवी हक्क व अधिकार म्हणजे केवळ पोलिस स्टेशन या घटकाशीच निगडीत संकल्पना आहे असा बहुतांश असलेला गैरसमज या संस्थेने मोडून काढायचे देखील काम जिल्ह्यातील विविध उपक्रमांद्वारा केलेले आहे त्याचसोबत या संस्थेत समाजाभिमुख व्यक्ती, गृहिणी, नोकरदार महिला, महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी सुद्धा खूप काही उपक्रमशीलतेने शिकता येते हे विशेष.
संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खंडूदेव कठारे, महाराष्ट्र राज्य निरिक्षक घन:श्याम सांडीम, राज्य सचिव राकेश शिंदे, कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, जिल्हाध्यक्ष मंदार काणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पदाधिकारी व सभासद यांनी या संस्थेची जिल्ह्यात केलेली रुजवण आता एका वृक्षाकडे वाटचाल करत आहे.
आज, ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व तालुका व जिल्हा संघटनेचे पदाधिकारी व सदस्य यांचा जिल्हास्तरीय भव्य मेळावा व मार्गदर्शन कार्यशाळा मालवणजवळील कोळंबच्या समर्थ मंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे.
या मेळाव्याचे उद्घाटन सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग्राहक न्यायालयाचे माजी अध्यक्ष ॲड. राजेंद्र पैलवान तर प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री परशुराम गंगावणे, एम.एस.ई.बी.मेडिक्लेम विभाग प्रमुख डॉ. अमोल धर्मजिज्ञासू, मालवण तहसीलदार वर्षा झालटे – भोसले, देवगड तहसीलदार आर.जे.पवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सागरी सुरक्षा शाखेचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर तसेच संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खंडूदेव कठारे, राष्ट्रीय सचिव प्रमोद केसरकर, महाराष्ट्र राज्य निरिक्षक घन:श्याम सांडीम, राज्य सचिव राकेश शिंदे, कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, जिल्हाध्यक्ष मंदार काणे असे दिग्खज मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनेच्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे तसेच जिल्हा संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी या जिल्हास्तरीय भव्य मेळावा व मार्गदर्शन कार्यशाळेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे आणि जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेत स्वयंसेवीपणे योगदान देण्यास इच्छुक असणाऱ्या जिल्ह्यातील व्यक्तींनी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंदार काणे किंवा कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांच्याशी संपर्क साधून उपस्थित रहावे असेही आवाहन कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक व सोहळ्याचे यजमानपद असलेल्या मालवण तालुका ह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनचे अध्यक्ष श्री. सुधीर धुंरी आणि सर्व पदाधिकारी व सभासद यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)