ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
चाफेड ग्रामस्थांनी गावठण मुख्य रस्ता ते प्रशालेपर्यंत श्रमदानाने केले रस्ता रुंदीकरण.

चाफेड ग्रामस्थांनी गावठण मुख्य रस्ता ते प्रशालेपर्यंत श्रमदानाने केले रस्ता रुंदीकरण.

प्रकाशन: 03 Feb 2024 06:19 PM
वाचन संख्या 259

शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील चाफेड गांव हा अतिशय दुर्गम भागात वसलेला आहे. येथील गावठण भागातील शाळेपर्यंत गेली कित्येक वर्षे पक्का रस्ता नसल्यामुळे खूपच गैरसोय होत होती. ग्रामस्थांनी एकत्र येऊन एकजुटीने हा रस्ता श्रमदानाने तयार केला. चाफेड गाव हा देवगड तालुक्याच्या एका टोकाला वसलेला आहे. या गावाची भौतिक रचना डोंगराळ भागात आहे. या गावात गावठण भागात शाळा असून या शाळेपर्यंत केवळ साधी पायवाट होती. त्यामुळे मुलांना शाळेत जाताना खूपच अडचणीचे होत होते. गावाचे निवडणूक केंद्र देखील याच शाळेत आहे. प्रत्यक्ष निवडणूक काळात रस्ता नसल्यामुळे मुख्य रस्त्यापासून या शाळेपर्यंत चारचाकी कुठलेही वाहन जात नव्होते. तसेच शाळेत शालेय पोषण आहाराचे साहित्य आणताना देखील खूपच कठीण जात होते. खूपच गैरसोय होत होती. त्यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येऊन एकजुटीने हा रस्ता लोकवर्गणी काढून तयार केला. भविष्यात या रस्त्यावर खडीकरण आणि डांबरीकरण व्हावे अशी ग्रामस्थांची एकमुखी मागणी आहे. याबाबत सरपंच किरण मेस्त्री, उपसरपंच महेश राणे यांनी आपण नक्कीच याबाबत लवकरात लवकर प्रयत्नशील राहून हा प्रश्न मार्गी लावू असे सांगितले.

गेले दोन दिवस गुरुवार आणि शुक्रवार या दिवशी ग्रामस्थांनी अथक मेहनत घेऊन या रस्त्याचे रुंदीकरण केले. तसेच रस्त्यालगत लागणाऱ्या जमिनी देखील संबधित जमीन मालकांनी विनामूल्य देऊन सहकार्य केले. या श्रमदानाच्या वेळी सरपंच किरण मेस्त्री, उपसरपंच महेश राणे, माजी सरपंच आकाश राणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन मोंडकर, माजी सरपंच संतोष साळसकर, शिवसेना शाखाप्रमुख उदय राणे, तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष प्रवीण राणे, अशोक घाडी, प्रदीप घाडी, दर्शना घाडी, प्रकाश मोंडकर, दिक्षिता घाडीगावकर, अनंत घाडीगावकर आदींसह ग्रामस्थ, महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गौरी नारकर, सरपंच किरण मेस्त्री यांनी उपस्थित ग्रामस्थांना खाऊचे वाटप केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स