हायवेवरील नडगिवे घाटात पलटला मुंबईकडे जाणारा कंटेनर…!
खारेपाटण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या मुंबई गोवा महामार्गावरील नडगिवे बांबरवाडीतील एका वळणावर गोव्याहून मुंबई च्या दिशेने जाणाऱ्या या कंटेनर पलटला. आज ११ ; ४० दरम्यान हा नडगिवे घाटातील अपघात झाला आहे.
या अपघातात कंटेनर चे नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे. अपघातात वाहन चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्याचा अंदाज आहे आणि त्याला दुखापत झाली असल्याचेही समजत असून त्याला जवळच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघाताची बातमी मिळताच खारेपाटण दूरक्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल मोहिते यांनी अपघाताच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)