ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
बांदिवडेत श्री पावणाई भगवती मंदिर येथे दुसरा वार्षिक गोंधळ उत्सव भक्तीचैतन्यात संपन्न.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

बांदिवडेत श्री पावणाई भगवती मंदिर येथे दुसरा वार्षिक गोंधळ उत्सव भक्तीचैतन्यात संपन्न.

प्रकाशन: 30 Jan 2024 02:59 PM
वाचन संख्या 262

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे जवळील बांदिवडे गांवात श्री पावणाई भगवती मंदिर येथे दुसरा वार्षिक गोंधळ शुक्रवारी संपन्न झाला.

“उदे…. उदे ….पावणाई देवीचा जयजयकार ,” अशा जयघोषात मंदिरातील वातावरण भक्तीचैतन्याने भारून गेले. सकाळी देवीची विधीवत पुजा झाल्या नंतर सुवर्णलंकार व भरजरी वस्त्रानी देवीला सजविण्यात आले. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. माहेरवाशीणीनी ओटी भरण्यासाठी गर्दी केली होती. रांगेतुन सर्वाना दर्शन मिळावे यासाठी वेळोवेळी सूचना देण्यात येत होत्या.

रात्री दिवटी पूजन व  मांड भरल्या नंतर गोधळ कार्यक्रम झाला. दिवटीस भक्तिने तेल अर्पण करण्यात आले. व त्यानंतर महाप्रसाद सर्वाना देण्यात आला. रात्री उशिरा वाढलेल्या थंडीची तमा न बाळगता हजारो भविकांची गर्दी झाली होती. उत्सवा निमित्त देवालय परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने झळाळुन गेला होता. मुंबई येथील शाम डेकोरेटर्सचे शाम परब यानी सर्व विद्युत रोषणाई केली होती. बांदिवडे पंचक्रोशीसह विविध ठिकाणाहुन आलेल्या देवीच्या भक्तानी, मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमान्यानी उपस्थिती दर्शविली.  

गोंधळ कार्यक्रमास प्रारंभ झाल्या नंतर रात्री नेत्रदिपक फटाक्यांची आताषबाजी करण्यात आली. देवालय परिसरात हंगामी स्वरुपाची हॉटेल, मिठाई दुकाने, बचत गटांचे स्टॉल, खेळण्यांची दुकाने उभारण्यात आली होती. खेळणी खरेदी करण्यासाठी लहान मुलानी गर्दी केली होती. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देवीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. देवस्थान मानकरी व ग्रामस्थ, माहेर वाशिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उत्सव यशस्विते बद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स