ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मुणगे वाचनालय येथे ग्रंथ प्रदर्शनास प्रतिसाद ; अध्यक्ष गोविंद सावंत यांनी केले उदघाटन

मुणगे वाचनालय येथे ग्रंथ प्रदर्शनास प्रतिसाद ; अध्यक्ष गोविंद सावंत यांनी केले उदघाटन

प्रकाशन: 30 Jan 2024 12:19 PM
वाचन संख्या 59

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मुणगे येथील भगवती वाचनालयामध्ये  मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथप्रदर्शना मध्ये  कथासंग्रह, कादंबरी, नाटक बाल वांड़;मय असे विविध वाचनीय साहित्य ठेवण्यात आले होते.
  
राज्यातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये / महामंडळे, केंद्रशासनाच्या अखत्यारीतील सर्व कार्यालये महामंडळे सार्वजनिक उपक्रम, सर्वखाजगी व व्यापारी बँका सर्व शैक्षणिक संस्था / विद्यापीठ /महाविद्यालये इत्यादी संस्थामधून राज्यांची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा १४ ते २८ जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येतो. या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन वाचनालयाचे अध्यक्ष गोविंद सावंत यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष महादेव प्रभू, कार्यकारीणी सदस्य  संतोष लब्दे, सौ उज्ज्वला महाजन, सुनील बोरकर, वाचनालयाचे कर्मचारी विश्वास मुणगेकर, सोमनाथ रूपे आदीं उपस्थित होत. या ग्रंथप्रदर्शनामध्ये  सन २०२३-२४ यावर्षी खरेदी करण्यात आलेल्या ग्रंथ ठेवण्यात आले होते. यामध्ये कादंबरी, कथासंग्रह, नाटकाची पुस्तके, बालवाड:मय, स्पर्धा परीक्षा पुस्तके, धार्मिक ग्रंथ आदी साहित्याचे प्रदर्शनात समावेश करण्यात आला होता. या प्रदर्शनाचा लाभ वाचकांनी घेतला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स