ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
शिरगांव आठवडी बाजार बुधवार ऐवजी उद्या मंगळवारी भरणार ; व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दादा पारकर यांची माहिती.

शिरगांव आठवडी बाजार बुधवार ऐवजी उद्या मंगळवारी भरणार ; व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दादा पारकर यांची माहिती.

प्रकाशन: 29 Jan 2024 03:21 PM
वाचन संख्या 155

शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या शिरगांवचा दर बुधवारी भरणारा आठवडा बाजार या आठवड्यात मंगळवार, ३० जानेवारी रोजी भरविण्यात येणार आहे. जिल्हा व्यापारी महासंघाचा बुधवारी मालवण येथे मेळावा होत असल्याने शिरगाव व्यापारी संघटनेने हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दादा पारकर यांनी दिली आहे.

शिरगांव येथील आठवडा बाजारासाठी आजूबाजूच्या तालुक्यांतील तसेच गावांतील फिरते व्यापारी, दशक्रोशीतील ग्राहक खरेदी- विक्रीसाठी येत असतात. दरवर्षी व्यापारी संघटनेचा जिल्हा मेळावा प्रत्येक तालुक्यात होत असतो. यावर्षी मालवण येथे बुधवार, ३१ जानेवारी रोजी हा मेळावा होत आहे. या दिवशी संपूर्ण जिल्ह्यातील व्यापारी आपापल्या आस्थापना बंद ठेवून या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. त्यामुळे या दिवशी होणारे सर्व आठवडा बाजार आदल्या दिवशी म्हणजे मंगळवारी भरविण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने शिरगाव येथील बुधवारी भरणारा आठवडा बाजार मंगळवार, ३० जानेवारी रोजी भरविण्यात येणार आहे. दर बुधवारी आठवडा बाजारासाठी शिरगाव येथे येणारे फिरते व्यापारी व ग्राहकांनी मंगळवारी भरणाऱ्या बाजाराला खरेदी- विक्रीसाठी यावे, असे आवाहन शिरगाव व्यापारी संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स