ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात २८ जानेवारी पासून जारी झाला मनाई आदेश…!

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २८ जानेवारी पासून जारी झाला मनाई आदेश…!

प्रकाशन: 28 Jan 2024 12:52 AM
वाचन संख्या 613

मालवण | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध समाजाचा आरक्षण मुद्दा, आगामी साजरे निमिताने जिल्ह्यात आयोजित करण्यात होणारे काही कार्यक्रम, सोशल मिडीयावर व्हायरल होणारे आक्षेपार्ह पोस्ट यांसोबत जिल्ह्यात होणारी उपोषणे, मोर्चा, निदर्शने आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन कोठेही अनुचित प्रकार घडू नये आणि जिल्ह्यातील जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी किशोर तावडे यांनी सिंधुदुर्ग जिल्हयाचे संपूर्ण भूभागात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) (अ) ते (फ) आणि ३७(३) प्रमाणे २८ जानेवारी २०२४ रोजी १ वाजल्यापासून ते दिनांक ११ फेब्रुवारी रोजी २४:०० वाजेपर्यंत मनाई आदेश लागू केले आहेत.

आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष वाढीसाठी सभा, मेळावे व शिबिराचे आयोजन करण्यात येत असून पदाधिकारी व कार्यकर्ते एकमेकांवर टीकाटिप्पणी करीत असतात. सोशल मिडीयावर धार्मिक भावना दुखावणारे आक्षेपार्ह पोस्ट व व्हीडीओ प्रसारित करून विविध समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून गाने पडसाद जिल्हयात उमटत आहेत.
दिनांक ०७ फेब्रुवारी रोजी शब -ए- मेराज (बड़ी रात) साजरी करण्यात येणार आहे. तसेच वैयक्तिक व सामाईक मागणीकरिता उपोषणे मोर्चा, संप, निदर्शने, रस्ता रोको वैगरे सारखे आंदोलनात्मक कार्यक्रमांचे वेळोवेळी नियोजन करण्यात येते अशावेळी आंदोलनकर्ते यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी राज्यात उत्सवाचे कालावधीत जातीय घटना घडलेल्या असून त्याचे पडसाद राज्यात उमटून विविध राजकीय पक्ष व संघटना आक्रमक झालेल्या आहेत. आगामी काळात त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटून जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून हे मनाई आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. या कालावधीसाठी सिंधुदुर्ग जिल्हयाचे संपूर्ण भूभागात खालील कृत्य करण्यास मनाई करीत आहे.

अ) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठया किंवा लाठ्या किंवा शारीरीक इजा करण्यांसाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे,

ब) अंग भाजून टाकणारा पदार्थ किंवा कोणताही स्प पदार्थ घेवून फिरणे,
क) दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे.

3) व्यक्तींची किंवा प्रेते किंया आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, (ज्या कारणामुळे समाजाच्या भावना दुखविली जाण्याची शक्यता असते.)

इ) सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजचौणे.

फ) सभ्यता अगर निली याविरुद्ध अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे अगर सांग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांल प्रसार करणे.

अ) सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये पाच अगर पाचाहून आदा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे मिरवणूक्त काढणे व सभा घेणे.

आ) हा हुकूम ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये व अधिकार बजावणीचे संदर्भात उपनिर्दीष्ट वस्तु हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींना पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग अगर संबंधीत उपविभार्ग किंवा सक्षम पोलीस प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना आणि लग्न, धार्मिक समारंभ, प्रेतयात्रा यांस लागू पडणार नाही.

वरील कालावधीतील मिरवणूकांना परवानगी देण्यांचे अधिकार तसेच ध्वनीक्षेपक वाजविण्यांस परवानगी देण्यांचे अधिकार पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग तसेच त्यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांस व सिंधुदुर्ग जिल्हयातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना राहील. या आदेशाचे जो कोणी उल्लंघन करीत तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५. प्रमाणे शिक्षेस पात्र राहील. असे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 9
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 317

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स