ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा…!

रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा…!

प्रकाशन: 28 Jan 2024 01:33 AM
वाचन संख्या 155

मालवण | नझ़िरा शेख़ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये ७५ वे प्रजासत्ताक दिन उत्साहात उत्साहात संपन्न झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून, रोझरी चर्च प्राथमिक शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सौ. मीना फर्नांडिस मंचावर उपस्थित होत्या तर मुख्याध्यापक फादर ऑल्वीन गोन्साल्वीस, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते. अध्यक्ष सौ. मीना फर्नांडिस यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले.

कार्यक्रमाला आयोजीत संचलनामध्ये राष्ट्रगीत, झेंडा गीत तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले गेले. इयत्ता आठवी मधील विद्यार्थी कु. वरद सावंत याने भाषण केले . शारिरीक शिक्षण तथा क्रीडा शिक्षक स्वप्निल तांबे यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्व आपल्या भाषणातून सांगितले. अध्यक्ष सौ. मीना फर्नांडीस यांनी सर्व मुलांना त्यांच्या भाषणातून उद्बोधक संदेश दिला. ७ वी च्या मुलांनी संविधान या विषयावर विशेष नाटिका सादर केली. सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारिया फर्नांडीस यांनी केले तर आभार प्रदर्शन बालवाडी शिक्षिका ( के जी शिक्षिका) जेसिंता यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक फादर ऑल्वीन गोन्साल्वीस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स