ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
ही तर 'निर्लज्ज बनो' वाली चळवळ ; कणकवलीतील 'निर्भय बनो' चळवळीच्या भूमिकेवर भाजपा प्रवक्ते अविनाश पराडकर यांचे सवाल.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

ही तर 'निर्लज्ज बनो' वाली चळवळ ; कणकवलीतील 'निर्भय बनो' चळवळीच्या भूमिकेवर भाजपा प्रवक्ते अविनाश पराडकर यांचे सवाल.

प्रकाशन: 26 Jan 2024 05:47 PM
वाचन संख्या 131

काही डावे विचारवंत ‘मोदी द्वेषाचा शिमगा’ घालत असल्याचीही केली टीका..!

असल्या थिल्लरपणाला कोकणी माणूस ‘शबय’ घालत नसल्याचाही अविनाश पराडकर यांचा टोला..!

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील ‘निर्भया बनो’चळवळीच्या भूमिकेवर भाजपा प्रवक्ते अविनाश पराडकर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे अनेक सवाल उठवले आहेत. अविनाश पराडकर यांनी म्हणले आहे की कोकणची भूमी ही साधुसंतांची भूमी आहे. इथल्या नागरिकांचे वर्तन शुद्ध आणि स्वच्छ असल्यामुळे त्यांच्यात बिलकुल डरपोकपणा नाही. त्यामुळे छुपा राजकीय अजेंडा घेऊन बाहेरून आलेल्या डाव्या विचारवंतांनी त्यांना निर्भय बनण्याचे धडे देण्याची काहीही गरज नाही. मात्र सिंधुदुर्गात येऊन इथल्या वारकऱ्यांवर गलिच्छ टिपणी करणाऱ्या काही विक्षिप्त लोकांना जनतेने चपलेने मारून, तोंडाला काळे फासून इथून बाहेर हाकलले हा इतिहास आहे. असल्या देव, देश आणि धर्म यांच्या विरोधात घृणास्पद भूमिका घेणाऱ्यांनी कितीही निर्भय बघण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. त्यापेक्षा आपल्या वागणुकीत सुधारणा करून योग्य मार्गावर चालण्याचा प्रयत्न करावा हे उत्तम, असा जाहीर सल्ला भाजपा महाराष्ट्र प्रवक्ते अविनाश पराडकर यांनी दिला आहे.

निर्भय बनवण्याचा बोगस कारखाना कणकवलीत उघडणाऱ्या लोकांचा अजेंडा हा निव्वळ मोदी द्वेष व भाजपा विरोधाचा आहे. जोवर नरेंद्र मोदी केंद्रात आहेत तोपर्यंत आपली देशद्रोही धोरणे आणि छुप्या कारवाया इथे चालणार नाहीत, याची कल्पना असलेले लोक घटनेची पायमल्ली ईडी- सीबीआयचा गैरवापर असल्या फसव्या बोंबा मारत आहेत. ज्यांना मुळातच कर नाही त्यांना डरण्याची गरजच काय?

सिंधुदुर्गात सोशल मीडियावर विषारी धार्मिक पोस्ट टाकून इथले वातावरण बिघडवण्याचे काम करणारे, महिला विनयभंगाचे आरोप असणारे काहीजण एकत्र येऊन नेमके यापुढे जिल्ह्यात काय घडवण्यासाठी ‘निर्भय’ बनायच्या गोष्टी करत आहेत हे चळवळीच्या आयोजकांनी स्पष्ट करावे. जे खरे निर्भय असतात, त्यांना ताकाला जाताना भांडे लपवावे लागत नाही. एकीकडे देशातल्या लोकशाही प्रणाली, न्याययंत्रणा यावर अविश्वास निर्माण करणारी कृती व वक्तव्ये करत लोकांमध्ये न्यायव्यवस्था विरोधी वातावरण करायचे, आणि वर लोकशाही धोक्यात असल्याची बोंब मारायची असली खोटी वृत्ती असलेले काही ढोंगी बहुरूपी असले निर्भयतेचे मुखवटे चढवत गावोगाव फिरत आहेत. त्यातच, जनतेच्या न्यायालयात जाऊन न्याय मागण्याची नाटके करणारे काही उध्वस्त अन बरखास्त पक्षप्रमुख अगतिकपणे आजकाल या लोकांची पालखी वाहू लागले आहेत. त्यांनी आपल्या पिढीजात संपत्तीचे खटले जनतेच्या न्यायालयात लढवण्यासाठीचा निर्भयपणा दाखवायची गरज होती. त्यांना सल्ला देणाऱ्या आणि विखारी वक्तव्यातून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांनी आधी आपला खरा चेहरा उघड करण्याएवढे निर्भय होण्याची गरज आहे. पण ती हिंमत नसलेले डरपोक बाहेरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत इथल्या जनतेला निर्भय व्हायला शिकवत आहेत. हा सगळा डावा विचारवंतांचा मोदीद्वेषाचा शिमगा चालला आहे, पण असल्या थिल्लरपणाला कोकणी माणसे कसली शबय घालतात याची कल्पना निर्भय बनोवाल्या निखिल वागळेंना चांगलीच आहे. या चळवळीत राममंदिर सोहळ्यानंतर धार्मिक द्वेषाच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत दंगली घडवणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुन्हा नोंद असलेले आरोपी सहभागी असल्याने इथले वातावरण बिघडू नये यासाठी सिंधुदुर्ग पोलीस यंत्रणेने निर्भय बनत यांचे खरे कारनामे मोडून काढण्याची गरज आहे. यादृष्टीने पोलीस अधीक्षकांचे लक्ष वेधले जाईल, असे अविनाश पराडकर यांनी म्हंटले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स