ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कासार्डे तर्फेवाडीतील मंदिर उजळले ५०० दिव्यांनी ; अयोध्येतील श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त अनोखी आरास.

कासार्डे तर्फेवाडीतील मंदिर उजळले ५०० दिव्यांनी ; अयोध्येतील श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त अनोखी आरास.

प्रकाशन: 23 Jan 2024 07:49 PM
वाचन संख्या 83

शिरगांव | संतोष साळसकर : अयोध्या येथील श्री राममंदिर प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यानिमित्ताने त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात प्रत्येक मंदिरात धार्मिक कार्यक्रम करण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत काल सोमवार २२ जानेवारीला कणकवली तालुक्‍यातील कासार्डे गावातील तर्फेवाडी पिंपळेश्‍वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराच्‍या गाभा-यात महापुरुषाच्या समोरच ‘जय श्री राम’ असे फुलांनी व पाकळयांनी सजवून काढले होते. तर मंदिराच्‍या गाभा-याच्‍या बाहेर जय श्री राम हे रांगोळीने व दिव्‍यांची रोशणाई करून काढण्‍यात आले होते. तसेच राम लल्‍लाच्‍या प्राणप्रतिष्ठेच्या वेळेनंतर दुपारी प्रसाद म्‍हणून पूर्ण वाडिला भोजनाचा प्रसाद देण्‍यात आला; तर संध्याकाळी भजन कीर्तन करून रात्रीही भोजन म्‍हणून प्रसाद वाटण्‍यात आला. तसेच पूर्ण मंदिर व मंदिरातील आतला भाग हा ५०० दिव्‍यांनी रोषणाई करून पूर्ण मंदिरच सजवल्‍याचे पिंपळेश्‍वर कासार्डे तर्फेवाडी विकास मंडळाचे सचिव दिनेश तर्फे यांनी सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स