ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
ह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शन सिंधुदुर्गच्या वतीने सा. बां विभाग कार्यकारी अभियंता अजयकुमार सार्वगौड यांना पोलिस वसाहतींबाबत दिले विशेष निवेदन.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

ह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शन सिंधुदुर्गच्या वतीने सा. बां विभाग कार्यकारी अभियंता अजयकुमार सार्वगौड यांना पोलिस वसाहतींबाबत दिले विशेष निवेदन.

प्रकाशन: 21 Jan 2024 11:12 PM
वाचन संख्या 141

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनच्या वतीने नुकतेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सार्वगौड यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिस वसाहतींबाबत विशेष निवेदन देण्यात आले. सर्व पोलीस कर्मचारी वर्गाच्या पोलीस वसाहतींची आवश्यकतेनुसार दुरुस्ती अथवा पुनर्वांधणी करून मिळावी म्हणजे कर्मचारी वर्गाला पुरेशा सुविधा उपलब्ध झाल्या तर कर्मचारी वर्गाचे मनोबल वाढून ते जास्त वेळ व त्वरीत सेवा देऊ शकतील असे या निवेदनात नमूद केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातील कणकवली सारख्या संवेदनशील शहरांत कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होऊन अशांततेची परिस्थिती उद्भवली तर तात्काळ पोलीस दल अथवा इतर कोणतीही सुरक्षा व्यवस्था करणे अवघड होते. कारण शहरातील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीसांसाठी पोलीस ठाण्यानजिकच असलेल्या वसाहती झालेल्या असल्याने सर्व कर्मचार्यांना आपली निवासाची व्यवस्था इतरत्र करावी लागते. पर्यायाने पोलीस ठाण्यापासून लांब राहावे लागते. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ फायदा व सुव्यवस्था राखणे फार अवघड होते. तरी कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्यातील सर्वच पोलीस वसाहती पुनर्बांधणी करून कर्मचारी वर्गाला सर्व सोयी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था तात्काळ करावी अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी ह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनचे कोकण विभागीयअध्यक्ष संतोष नाईक, कणकवली तालुका कार्याध्यक्ष हनीफ़भाई पिरख़ान, डाॅ. हर्षदकुमार पटेल और तळवडेकर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स