ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आमदार वैभव नाईक.यांचा भाजप सरकारवर हल्लाबोल…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आमदार वैभव नाईक.यांचा भाजप सरकारवर हल्लाबोल…!

प्रकाशन: 21 Jan 2024 06:31 PM
वाचन संख्या 177

वायंगणी आणि तोंडवळी गांवात आभदार वैभव नाईक येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी भाजप सरकार हे कोकण वर अन्याय करणारे सरकार असल्याचे केले प्रतिपादन.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या वायंगणी आणि तोंडवळी गावाची सत्ता ग्रामस्थांनी शिवसेनेकडे दिल्यानंतर येथील विविध विकास कामे मार्गी लावण्यात यश आले. वायंगणी गावामध्ये विविध योजने मधून विकास कामांसाठी ५५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. तोंडवळी मध्ये इतर विकास कामांबरोबरच धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यात येत आहे. वायंगणी मध्ये मुख्यमंत्री ग्रामसडकच्या रस्त्याच्या कामाचे पालकमंत्र्यांनी भूमिपूजन केले त्याला दोन महिने झाले तरी कामाची वर्कऑर्डर होत नाही. शिंदे आणि भाजपने केवळ मंजूर विकास कामे थांबविण्याचे काम केले आहे.मात्र कोर्टाने स्थगिती उठविण्याचे आदेश दिल्याने कामे पुन्हा सुरु झाली.त्यामुळे भाजप सरकार कोकणवर अन्याय करणारे सरकार आहे अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.

वायंगणी आणि तोंडवळी गावामध्ये विविध विकास कामांची भूमिपूजने आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली.यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानत सत्कार केला. यामध्ये वायंगणी नळेकरवाडी येथे श्री. स्वामी समर्थ मठाच्या बाजूला सभामंडप बांधणे १० लाख, वायंगणी भटवाडी ते पाटवाडी येथे स्ट्रिटलाईट बसवीणे ५ लाख, वायंगणी घाडीवाडी ते ज्ञानदिप हायस्कूल रस्ता खडिकरण व डांबरीकरण करणे २६ लाख, घाडीवाडी ते स्मशानभूमी स्ट्रिटलाईट बसविणे ५ लाख, वायंगणी तळेवाडी येथे जलजिवन मिशन योजने अंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेची टाकी बांधणे, हिर्ले वायंगणी ग्रा. मा. क्र. ४१ डांबरीकरण करणे ५ लाख, वायंगणी गावराखा येथे गणेश घाट बांधणे निधी ४ लाख त्याचबरोबर तोंडवळी वरची वाघेश्वर मंदिर ते गांगोमंदिर करंजेवाडी येथे संरक्षक भिंत बांधून रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे निधी ६ लाख ५७ हजार रु. निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांची भूमिपूजने करण्यात आली.

याप्रसंगी तोंडवळी येथे शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,विभाग प्रमुख समीर लब्दे,आचरा समन्वयक मंगेश टेमकर, तोंडवळी सरपंच नेहा तोंडवळकर, उपसरपंच हर्षद पाटील, संजय केळुसकर, युवासेना शाखा प्रमुख राजा पेडणेकर, ग्रा. प. सदस्य ज्ञानेश गोलतकर, अनन्या पाटील,मानसी चव्हाण,दशरथ वायंगणकरनिनाद गोलतकर, अक्षय पुजारे, विष्णू गोलतकर, संतोष आचरेकर, अनिल पाटील, राजेंद्र तोंडवळकर, हेमंत पाटील, श्रीकृष्ण पुजारे, अरुण पाटील, सुनील चेंदवणकर, सुभाष पाटील, मनोहर पाटील, महेश चव्हाण, देविका पाटील, निधी पाटील, मानसी चव्हाण, रोहन पेडणेकर,ओमकार पाटील, शंकर पेडणेकर, किशोर पेडणेकर,तारका पेडणेकर, प्रमोद पाटील . प्रकाश चव्हाण, सदानंद गोलतकर,शेखर मुळे आदी ग्रामस्थ

वायंगणी येथे उपतालुकाप्रमुख उदय दुखंडे, उपविभाग प्रमुख सचिन रेडकर,सरपंच रुपेश पाटकर, उपसरपंच समृध्दी आसवलकर, शाखाप्रमुख दिनेश साळकर, साई साळकर, ग्रा. पं. सदस्य श्रीकृष्ण वायंगणकर, आनंद मुरवणे, स्वप्नील सुर्वे, सागर राणे, रुपेश राणे, गुरुनाथ वायंगणकर, अनिल महाजन, बाळकृष्ण सावंत, दिलीप कांबळी, पंडित खोत, संतोष सावंत, सुंदर भगत, सविता राणे, साई साळकर, प्राची साळकर, लतिका वायंगणकर, वनिता राणे, सूर्यकांत सावंत, सीमा सावंत, उदयचंद्र नाईक, आजगावकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 449

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स