ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
जिल्हा आरोग्यविभागाचा लसिकरणावर भर..!

जिल्हा आरोग्यविभागाचा लसिकरणावर भर..!

प्रकाशन: 15 Oct 2021 01:28 AM
वाचन संख्या 31
ओरोस | प्रतिनिधी: जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 5 लाख 8 हजार 140 नागरिकांनी पहिला डोस घेतला असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

यामध्ये एकूण 9 हजार 835 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 61 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 917 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 712 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 1 लाख 25 हजार 821 व्यक्तींनी पहिला डोस तर 81 हजार 80 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 1 लाख 48 हजार 400 नागरिकांनी पहिला डोस तर 90 हजार 347 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 2 लाख 14 हजार 167 जणांनी पहिला डोस तर 77 हजार 887 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 7 लाख 74 हजार 227 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 7 लाख 98 हजार 180 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 6 लाख 14 हजार 180 लसी या कोविशिल्डच्या तर 1 लाख 84 हजार लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 6 लाख 232 कोविशिल्ड आणि 1 लाख 73 हजार 995 कोवॅक्सिन असे मिळून 7 लाख 74 हजार 227 डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 69 हजार 120 लसी उपलब्ध असून त्यापैकी 54 हजार 30 कोविशिल्डच्या आणि 15 हजार 90 कोवॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्ह्यात सध्या 4 हजार 100 लसी शिल्लक असून त्यापैकी 4 हजार 50 कोविशिल्ड आणि 50 कोवॅक्सीनच्या लसी शिल्लक आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स