ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
श्री क्षेत्र अक्कलकोट येथील वटवृक्ष देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध :उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

श्री क्षेत्र अक्कलकोट येथील वटवृक्ष देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध :उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

प्रकाशन: 20 Jan 2024 12:30 AM
वाचन संख्या 59

मसुरे | प्रतिनिधी : आपण श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त आहोत. स्वामी कृपेनेच जीवनात आरोग्य, स्थैर्य, समाधान आहे, त्यामुळे पुन्हा एकदा अक्कलकोटला येऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेण्याचा मानस होता. ती इच्छा आज पूर्ण झाली आहे. मी व माझे कुटुंब स्वामी समर्थांच्या कृपेचे ऋणी आहोत त्यामुळे स्वामींच्या वटवृक्ष देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ते नुकतेच अक्कलकोट दौऱ्यावर आले असता येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास आवर्जून भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा, देवून यथोचित सत्कार केला. याप्रसंगी फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर जाता जाता त्यांनी मंदिर परिसराची पाहणी करून मंदिरात होत असलेल्या विविध विकासाभिमुख कामे पाहून व मंदिर समितीचे उपक्रम जाणून घेऊन समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे आमदार सुभाष बापू देशमुख, आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, आमदार राम सातपुते, आमदार राजाभाऊ राऊत, तहसीलदार बाळासाहेब शिरसाट,
भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी बापू पवार, भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, शहराध्यक्ष शिवशरण जोजन, सोलापूरचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतमकुमार यावलकर, उपअधिक्षक विलास यामावार, पी.आय. जितेंद्र कोळी, पी.आय. महेश स्वामी, मंदार महाराज पुजारी, व्यंकटेश पुजारी, गोकुळ शुगर्सचे चेअरमन दत्ता शिंदे, कोळी महासंघ पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अरुणभाऊ लोणारी, गवंडी समाज अक्कलकोट तालुकाध्यक्ष चंद्रकांत गवंडी, उद्योगपती शैलेश राठौर, वैजूनाथ मुकडे, श्रीशैल गवंडी, माजी नगरसेवक यशवंत धोंगडे, रामचंद्र समाणे, राजाभाऊ झिंगाडे, ॲड.विजय हर्डीकर, मनोज इंगुले, संतोष कलबुर्गी, नितीन कटारे, शिवशंकर स्वामी, स्वप्निल गायकवाड, सुनील पवार, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संजय पवार, शिवशरण अचलेर, गिरीश पवार, ऋषिकेश लोणारी, सागर गोंडाळ आदींसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 441

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स