श्री देव बांदेश्वर मंदिर भक्त निवाससाठी १० लाख रुपये मंजूर ; पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे बांदा भाजपाच्या वतीने मानले गेले विशेष आभार.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा गांवचे आराध्य दैवत श्री देव बांदेश्वर मंदिर च्या भक्त निवाससाठी १० लाख रुपये मंजूर झाले आहेत. यासाठी माजी पंचायत समिती सभापती श्री शीतल राऊळ यांनी मागणी केली होती यासंदर्भातील माहिती भाजपा बांदा शहराध्यक्ष बाबा काणेकर यांनी दिली. बांदा गाव महाराष्ट्र व गोव्याच्या सीमेवर असल्याने दर्शनासाठी येणा-या भाविकांची गैरसोय लक्षात घेऊन भक्त निवास व्हावे यासाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या कडे निवेदनाद्वारे माजी पं समिती सभापती शीतल राऊळ यांनी मागणी केली होती. याला यश आले असून या भक्त निवासासाठी दहा लाख रुपये मंजुर करण्यात आले आहेत. भारतीय जनता पार्टी बांदा शहर तर्फे पालकमंत्र्यांचे आभार मानले गेले आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)