ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कु. रजत रविकिरण तोरसकरने पटकावले रजत पदक ; नागपुर येथिल अश्वमेध टेबल टेनिस स्पर्धा.

कु. रजत रविकिरण तोरसकरने पटकावले रजत पदक ; नागपुर येथिल अश्वमेध टेबल टेनिस स्पर्धा.

प्रकाशन: 17 Jan 2024 02:36 PM
वाचन संख्या 126

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या टोपीवाला हायस्कूलचा माजी विद्यार्थी रजत रविकिरण तोरसकर याने नुकत्याच खेळवल्या गेलेल्या टेबल आंतर विद्यापीठ आश्वमेघ राज्य टेबल टेनीस स्पर्धेत रौप्य तथा रजत पदक पटकावले. नागपुर (१२-१४ जानेवारी २०२४) येथे या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धत महाराष्ट्रातील बावीस विद्यापीठांचा सहभाग होता. रजत तोरसकर व त्याच्या संघाने याने सदरच्या स्पर्धेमध्ये नागपूर विभागातील संत तुकडोजी महाराज विद्यापीठ चे प्रतिनिधित्व केले.अतिशय चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत नागपूर संघाने अतिशय उत्कृष्ट खेळ करत अंतिम फेरीत प्रवेश केला व रौप्य पदक पटकावले तर पुणे येथील विद्यापीठ सुवर्णपदकाचे मानकरी ठरले.

कु.रजत रविकिरण तोरसकर हा मालवण येथील टोपीवाला हायस्कूल आणि स.का पाटील महाविद्यालय याचा माजी विद्यार्थी आहे. नुकत्याच झालेल्या भोपाळ येथील टेबल टेनिस च्या विद्यापीठीय राष्ट्रीय विभागीय स्पर्धा मध्ये कास्य पदक मिळवले होते त्यामुळे त्याला खेलो इंडिया स्पर्धा खेळण्याची संधी.मिळाली आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स