ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
बिळवस सातेरी मंदिर रस्त्याच्या कामाचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन ; अर्थसंकल्प २०२२ -२३ अंतर्गत १९ लाख रु. निधी मंजूर.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

बिळवस सातेरी मंदिर रस्त्याच्या कामाचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन ; अर्थसंकल्प २०२२ -२३ अंतर्गत १९ लाख रु. निधी मंजूर.

प्रकाशन: 16 Jan 2024 04:57 PM
वाचन संख्या 47

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या बिळवस प्रमुख जिल्हा मार्ग ३२ ते बिळवस सातेरी मंदिर जाणारा ग्रा. मा. २६९ या रस्त्याच्या खडीकरण डांबरीकरणासाठी आमदार वैभव नाईक यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात अर्थसंकल्प (बजेट) २०२२ -२३ अंतर्गत १९ लाख रु. मंजूर केले आहेत. मात्र राज्य सरकारने या कामाला स्थगिती दिली होती. न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने ही स्थगिती उठविली आहे. त्यामुळे या कामाला आता सुरुवात होत असून आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते रविवारी या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. काम मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.

याप्रसंगी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, कुडाळ विधानसभा संपर्कप्रमुख संग्राम प्रभुगावकर, पंकज वर्दम, अमित भोगले, विभागप्रमुख राजेश गांवकर, विजय पालव, पराग नार्वेकर, युवासेना विभाग प्रमुख राहुल सावंत, शाखा प्रमुख रामचंद्र पालव, उप शाखाप्रमुख रमेश फणसे, मोहन पालव, सुबोध पालव, भाई पालव, रमेश पालव, भाई माधव, विकास सावंत, अबा पालव, ग्रा. पं. सदस्य प्रकाश फणसे, भावेश पालव, अनु पालव, बाळू माधव, पंडी पालव, अशोक पालव, पपू पालव, संदीप पालव, संतोष पालव, राजू पालव, बाबू रेडकर, समीर पालव, सचिन पालव, सुधीर पालव, उदय पालव, गोपाळ पालव, संतोष पालव, चंदू पाताडे, बाळा नाईक, संकेत पालव, सुबोध फणसे, सुजित पालव, रोहित सावंत,अशोक जनार्दन पालव, आदित्य सावंत,राष्ट्रपती पालव, चेतन पालव, बबन नाईक, ओमकार राणे, अंकल पालव, दाजी गावडे, संभाजी पालव, भास्कर पालव, कमलाकर पालव, सचिन पालव, ज्ञानेश फणसे, रितेश फणसे, सत्यवान पालव, आपू पालव, अर्थव पालव, प्रवीण फणसे, युवराज पालव, सुरेश पालव, परशुराम फणसे, गुरू फणसे, एकनाथ राणे, अरुण पालव, शार्दुल पालव यांसह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स